शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कृंतक

पु.

(वै.) पुढचा दात; चौकडीचा-छेदक-दात. [सं.]

कृंतक

वि.

करांडणारे; कुरतडणारे. [सं. कृत् - कृंत् = कुरतडणे]

कृंतकप्राणी

पु.

एक प्राणिवर्ग. हे प्राणी पालेभाज्या गवत कुरतडून खातात. उदा. ससा, उंदीर, खार इ.

कृंतन

न.

१. कापणी. २. नखाने, दातांनी कुरतडणे. [सं. कृत् - कृंत् = कुरतडणे]

कृक

पु.

घाटी; गळा; घसा; कंठनाल. [सं.]

कृकर

पु.

१. ढेकराच्या वेळचा वायू. पंच उपप्राणांपैकी एक. पहा : कूर्म : ‘आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादी होय ॥’ - ज्ञा १८·३४१ [सं.]

कृकल

पु.

१. ढेकराच्या वेळचा वायू. पंच उपप्राणांपैकी एक. पहा : कूर्म : ‘आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादी होय ॥’ - ज्ञा १८·३४१ [सं.]

कृकलास

पु.

सरडा : ‘दान देता नहुषां कूषी जाहला कृकलास ।’ - एभा ६·९५. [सं.]

कृच्छ्र

न.

१. एक प्रायश्चित्त; २. शारीरिक दुःख; कष्ट; तप : ‘माझे नि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छ्रादिक ।’ - एभा १७·४२०. ३. पाप. ४. पहिल्या दिवशी एकदा जेवण, दुसऱ्या दिवशी सायंकाळी जेवण, तिसऱ्या दिवशी न मागता आपोआप मिळेल ते खावे व चौथे दिवशी उपोषण याप्रमाणे क्रमाने

कृच्छ्र

न.

मूत्रकृच्छ्र; मूत्रावरोध.

कृच्छ्रचांद्रायण

न.

चंद्रकलेप्रमाणे चढउताराने जेवणातील घास खाण्याचे कृच्छ्र. प्रायश्चित : ‘कृच्छ्रचांद्रायणें झालीं वेडीं ।’ - एभा १२·२७. [सं.]

कृच्छ्रेंकरून

किव्रि.

नाखुशीने, कष्टाने (येणे, करणे इ.).

कृत

न.

कृत, त्रेता, द्वापार व कली या युगांपैकी पहिले; सत्ययुग. [सं.]

कृत

वि.

ज्याने केलेले आहे या अर्थाने समासाच्या पूर्वी जोडतात. उदा. कृतभोजन-ज्याने जेवण केलेले आहे असा.

कृत

वि. उप.

कृतकृत्य; ज्याने आपला हेतू साध्य केला आहे असा; ज्याला काही करायचे उरले नाही असा; तृप्त.

कृतक

वि.

(उंदीर, ससा, खार इत्यादीप्रमाणे) कुरतडणारा.

कृतक

वि.

मानलेला; दिखाऊ; नाटकी; लटका. [सं.]

कृतकपुत्र

पु.

(कायदा) मानलेला, पाळलेला मुलगा; विकत घेतलेला मुलगा. [सं.]

कृतकर्मा

वि.

निपुण; कुशल; हुशार. [सं.]

कृतकार्य

वि.

ज्याने आपले काम संपविले आहे असा; यशस्वी; विजयी; कृतार्थ; प्राप्तयश. पहा : कृतकृत्य [सं.]