शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

के

क्रिवि.

कोठे : ‘तये वेळीं तूं कवणें कें । देखावासी ॥’ - ज्ञा १·२२९. [सं. क्व]

के

क्रिवि.

कसे : ‘परदैवा कें नांदणें । आपुलेनि आंगें ।’ - ऋ ४२. [सं. कथ]

के

सना.

काय : ‘तंव कें नारदु भणे ।’ - शिव १२६. [सं. किम् = काय]

कें

केंकरे

न.

फावडे; खोरे; केगरे. (राजा.)

केंकावणे

पहा : केकटणे : ‘(कुत्रा) दुःखाने शब्द करतो त्यास केंकावणे म्हणतात.’ - मराठी ३ रे पु (१८७३) पृ. १२१. [ध्व.]

केंगटणे

क्रि.

मेटाकुटीला, जेरीला, जिकिरीला येणे : ‘पोटात काय न्हाई. बैलं केंगटून गेल्यात.’ - गोता ४५. (कर.)

केंगटीला येणे

क्रि.

मेटाकुटीला, जेरीला, जिकिरीला येणे : ‘पोटात काय न्हाई. बैलं केंगटून गेल्यात.’ - गोता ४५. (कर.)

केंजणे

अक्रि.

विनवणे; ‘हां जी हां जी करणे.’ - (तंजा.)

केंजळ

पहा : किंजळ १.

केंड

न.

हरिकातील फोल; धान्यावरील आवरण.

केंड

पु.

१. निकृष्ट माशाची एक जात. हा मासा वाटोळा असतो. २. जळालेल्या गवऱ्यांचा ढीग. ३. ज्वाळा. (गो.) [क. केंड = जळता निखारा.], ४. कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज.

केंडणी

स्त्री.

अवहेलना.

केंडणे

उक्रि.

१. अडवणे; रोधणे; अडथळा करणे. २. (सर्व अर्थी) कोंडणे. उदा. अडवून ठेवणे, बांधून टाकणे, खिळून ठेवणे. ३. खुंटणे; बरोबर वाढ न होणे. (व.) [क. केडिसु, केडु], ४. दोषारोप ठेवणे; दूषण देणे; तुच्छ लेखणे; टोचून बोलणे : ‘कोणाही केंडावें हा आम्हां अधर्म ।’ - तुगा ४२४५.

केंडला

क्रिवि.

कशाला. (चि.)

केंडशी

स्त्री.

बुरा; बुरशी.

केंडावणे

अक्रि.

वेडावणे; खट्टू करणे.

केंडूस

वि.

बुरसलेले; केंडशी आलेले.