शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कै

कोठे : ‘तरि मागिला जुंझी राणे । कै गेलें होते ।’ - शिव ९१५. [सं. क्व]

कै. कैं

वि.

कित्येक; अनेक.

कै. कैं

क्रिवि.

१. केव्हा; कधी. पहा : कई : ‘आता कर्मठां कैवारी । मोक्षाची हे ॥’ - ज्ञा १८·६८. [सं. कदा]

कैं

कोठे : ‘तरि मागिला जुंझी राणे । कै गेलें होते ।’ - शिव ९१५. [सं. क्व]

कैंची

वि.

१. कोणता, २. कोठचा; कोठील; कसला : ‘कैंचा धर्म कैंचे दान । कैंचा जप कैंचे ध्यान ।’ - दास २·५·११.

कैक

वि.

पुष्कळ; कित्येक. [सं. कतिपय + एक]

कैकट

पहा : कीकट : ‘आणि देख कैकट फटकाळा ।’ - यथादी १७·२३५.

कैकट

वि.

१. भयंकर; रानटी; वाईट; दरिद्री; किड्यांचा (देश). २. मगध देशासंबंधी. (मगधामध्ये म्लेंछांचे ठाणे असल्यामुळे तो धर्मकृत्याला अयोग्य असा मानला गेला आहे) : ‘मग म्लेंच्छाचे वसौटे । दांगाणे हन कैकटे ।’ - ज्ञा १७·२९४. [सं. कीकट]

कैकटा

कैकड

कैकाई

पहा : कैकाडीण : ‘कैकायी कैकायी दुरील माझा देश ।’ - भज ४०.

कैकाट

न.

कैकाडी लोकांचा समूह; एक जात.

कैकाड

वि.

भांडखोर.

कैकाडी

पु.

एका जातीचे नाव. त्या जातीतील माणूस. या जातीतील लोक बुरड्या, टोपल्या इ. विकून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रात यांच्या चार पोटजाती आहेत. [सं. कीकट]

कैकाडीण

स्त्री.

१. कैकाड्याची, कैकाडी जातीची स्त्री : ‘प्रथमचि मी तव दादा कैकाडीण झालें ।’ - भज ४०. २. कैदाशीण; भांडखोर स्त्री. ३. (प्रेमाने) गबाळ, केस पिंजारलेल्या मुलीला म्हणतात.

कैकायी

पहा : कैकाडीण : ‘कैकायी कैकायी दुरील माझा देश ।’ - भज ४०.

कैकाळ

पहा : कळिकाळ : ‘कैकाळाचें धाक नाहीं अवघीं विघ्नें नीवारी ।’ - ऐपो. ३५०.

कैके

स्त्री.

१. दशरथ राजाची पत्नी : ‘कैकेयी आनंदली थोर ।’ - रावि ३·९५. २. (ल.) शिरजोर, दुष्ट, कजाग, हट्टी स्त्री. [सं. केकय]