शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कोंकड

स्त्री. न.

पहा : खोकड

कोंकणा

पु.

सर्वसाधारण गोमंतकातील हिंदू लोकांना उद्देशून ख्रिस्ती लोक हा वापरतात तो शब्द. (गो.)

कोंकणे

अक्रि.

ओरडणे; आरवणे. (राजा.)

कोंकतर

स्त्री.

पाणकोंबडा. (गो.) [सं. कोक]

कोंकतारी

स्त्री.

पाणकोंबडी. (गो.) [ध्व.]

कोंकतारी

स्त्री.

पाणकोंबडा. (गो.) [सं. कोक]

कोंकारचे

अक्रि.

कोंबड्याचे आरवणे. (गो.) [ध्व.]

कोंकारी

स्त्री.

१. पाणकोंबडा. २. एक मासा. (गो. कु.) [ध्व.]

कोंकेर

न.

पाथरवटाचे हत्यार (दगड काढण्याचे). (गो.)

कोंकेरी

स्त्री.

एक पक्षी; पाणकोंबडा : ‘काळी कोंकेरी भातात लपून...’ - आआशे १६९. पहा : कोंकारी

कोंग

न.

१. ढोंग; सोंग (दारिद्र्य, दुःख, वेड इ. चे). (क्रि. घेणे, करणे, लावणे.) : ‘जो न्यायासनावर चढला कीं दुष्यंत राजाप्रमाणें त्या गांवचाच नाहीं असें बळानें कोंग मात्र करतो...’ - निमा ६२५. [क.], २. कुबड; कुबड्या. पहा : कोक [क.]

कोंगटे

न.

वस्त्र; पांघरूण : ‘तेयावरी पासौडी पांगुरले : वरि जाडीचे कोंगटें :’ - लीच २·७८.

कोंगते

न.

घुंगट, बुरखा : ‘उजवेया हाता सोरठिस जाडीचे कोंगते घालुनि...’ - स्थापो २८.

कोंगल्ल

वि.

वाकडेतिकडे; कोंग. (गो.) [क. कोंक - ग.]

कोंगळी

स्त्री.

विळा; कोयती; गवत कापण्याची कात्री. [क. कोंग = वाकडी विळी]

कोंगा

पु.

१. पाणथळ शेतात राहून भाताची नासाडी करणारा प्राणी. (गो.) २. एक लहान मासा. [ध्व.], ३. (ल.) मूर्ख माणूस.

कोंगा

वि.

रोंग्या; रोगी; कुबडा. [क. कोग]

कोंगाटी

वि.

अव्यवस्थित राहणारा : ‘माणसानं कोंगाट्यासारखं राहावं असं आहे की काय?’ - लव्हाळी २६१.

कोंगाडा

पु.

(ल.) मूर्ख माणूस.

कोंगाडा

वि.

रोंग्या; रोगी; कुबडा. [क. कोग]