शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

क्रंदन

न.

रडणे. पहा : आक्रंदन [सं.]

क्रउ

पु.

खरेदी, खरेदीची किंमत.

क्रकच

पु. न.

करवत. [सं.]

क्रकचमक्षिका

स्त्री.

(प्राणि.) झाडाच्या पानाला व फांदीला भोके पाडून पानावर अंडी घालणारी माशी. [सं.]

क्रकचयोग

पु.

एक अशुभ योग : ‘तिथीचा अंक आणि वाराचा अंक यांची बेरीज १३ होते तेव्हा अशुभ क्रकचयोग होतो.’ - सुज्यो २४७. [सं.]

क्रण

न.

करण; साधन (योगमार्गातील) : ‘चाऱ्ही क्रणें प्रगटली’ - लीचपू २०६.

क्रतु

पु.

१. यज्ञ : ‘म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।’ - ज्ञा ३·१३९. २. (प्रामुख्याने) अश्वमेध यज्ञ. ३. सप्तऋषींपैकी एक ऋषी. [सं.]

क्रतू

पु.

१. यज्ञ : ‘म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।’ - ज्ञा ३·१३९. २. (प्रामुख्याने) अश्वमेध यज्ञ. ३. सप्तऋषींपैकी एक ऋषी. [सं.]

क्रदंत

पहा : कृतांत

क्रम

पु.

१. वर्ग; अनुक्रम. २. व्यवस्था; मांडणी; पद्धत; काही नियमानुसार चालणे; मोड. ३. प्रगती; पुढे जाणे; क्रमण. ४. धार्मिक विधी; नियम. ५. (संगीत) स्वरांचा आरोह. ६. परंपरा; सरणी; संप्रदाय. [सं.]

क्रमआगत

वि.

क्रमप्राप्त; वारसाने मिळालेला (वाटा).

क्रमआगयात

वि.

क्रमप्राप्त; वारसाने मिळालेला (वाटा).

क्रमगामी दंडादेश

स्त्री. पु.

(विधि.) एकूण शिक्षा, दंड.

क्रमगामी शिक्षा

स्त्री. पु.

(विधि.) एकूण शिक्षा, दंड.

क्रमचय

(ग.) वस्तूंचा संच किंवा त्या संचातील काही घटकांची क्रमिक तऱ्हेने केली जाणारी मांडणी.

क्रमचित्र

न.

औद्योगिक प्रक्रियेतील साधनसामग्री वा कामाची प्रणाली यांचा अनुक्रम वा आनुपूर्वी दाखवणारा आलेख.

क्रमण

न.

गती; गमन; पुढे जाणे; पुढे पुढे सरणे; चालणे; प्रगती. [सं.]

क्रमणे

अक्रि.

१. (वेळ, काळ) आनंदात काढणे, घालविणे, करमणे. २. आक्रमण करणे, पुढे जाणे, चालणे; ओलांडणे; पलीकडे जाणे; उल्लंघणे : ‘क्रमी ध्यानाचें चवरें । सांपडे तंव ॥’ - ज्ञा ६·५८. ३. मरणे : ‘संवसारें जालों अतिदुःखे दुःखी । मायबापें सेखीं क्रमिलिया ।’ - तुगा ६५३. [सं. क्रम

क्रमत्रैराशिक

पु. न.

सरळ त्रैराशिक. [सं. क्रम = जाणे]

क्रमपाठी

वि.

वेदसंहितेतील दोन दोन पदांचा अनुक्रम धरून एक वाक्य तयार करून पठण करणे व पठण करताना मागील पद पुढील पदाला जोडणे, याप्रमाणे अध्ययन करणारा. उदा. ‘अग्निमीळे । ईळे पुरोहितम् । पुरोहितयज्ञस्य ।’ इ. ह्याप्रमाणे जटापाठी, घनपाठी, शाखापाठी असे अध्ययन करणाऱ्यांचे दुसर