शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

क्रिंतन

स्त्री.

(सं.) मुरकी.

क्रिडाछेदी

वि.

खेळाडू.

क्रिप्त

पु.

(शाप.) हवेत अतिसूक्ष्म प्रमाणात असणारा एक वायू. [इं. क्रिप्टॉन]

क्रिप्तन

पु.

(शाप.) हवेत अतिसूक्ष्म प्रमाणात असणारा एक वायू. [इं. क्रिप्टॉन]

क्रिमि

पु.

जंतू; किडा; कीटक. [सं. कृमि]

क्रिमी

पु.

जंतू; किडा; कीटक. [सं. कृमि]

क्रियमाण

क्रिवि.

१. चालू क्रिया (जी केली जात आहे अशी); हातातील काम, गोष्ट : ‘प्रारब्धाचे शिळे दही व क्रियमाणाची दूधसाय...’ – एवाका २७४. २. पुढील, भावी कार्य (जे व्हायचे ते); ज्याचा आरंभ करायचा ते कार्य. ३. पूर्व जन्मीचे जे संचित असते त्याचे या जन्मी भोगावे लागणारे बरेवाईट

क्रिया

स्त्री.

१. कर्म; काम; कृत्य; करणी; कृती : ‘असेल माझी क्रिया बरी ।’ - वेसीस्व ३·६४. २. और्ध्वदेहिक कर्म; प्रेतसंस्कार विधी; उत्तरकार्य; क्रियाकर्मांतर. (क्रि. करणे.) : ‘करुनि क्रिया पित्याची गेला तो श्रितभवाब्धिसेतुकडे ।’ - मोवन १०·८३. ३. धार्मिक विधी. ४. कोणत्याह

क्रिया अनुसंधान

न.

क्रियाकर्म; एकानंतर दुसरी क्रिया, त्याचा संबंध.

क्रियांगराग

पु.

(संगीत) शास्त्रातील नियम कायम ठेवून विचित्रतेसाठी विवादी स्वरांचा उपयोग ज्या रागात केला जातो असा राग. [सं.]

क्रियाअक्षमता

स्त्री.

(वै.) अर्धांगवायू झालेला नसताही इंद्रिये किंवा गात्रे काम न करू शकणे - ही अवस्था. [सं.]

क्रियाकरण

न.

आचरण.

क्रियाकर्म

पहा : क्रिया ३ [सं. क्रिया + कर्मन्]

क्रियाकर्मांतर

पहा : क्रिया २ [सं.]

क्रियाकलाप

पहा : क्रिया ४ : ‘परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दीसे बरवा ।’ - राज्ञा ४·९४. [सं.]

क्रियाकांड

न.

कर्मकांड; ठरावीक नियमांना धरून वागणे. [सं.]

क्रियाकौशल्य

न.

क्रिया करण्याची हातोटी; कामातील कुशलता; वाकबगारी. [सं.]

क्रियागुणांक

पु.

(मानस.) व्यक्तीचे भाषण किंवा लिखाण यांमधील क्रियावाचक शब्द (क्रियापद) आणि विशेषण यांचे गुणोत्तर.

क्रियाचक्र

न.

ठरावीक कालमर्यादेत होणारे क्रियेचे वर्तुळ.

क्रियादेशधानी

स्त्री.

लायब्ररी (संगणक).