शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

क्रीड

न.

ध्येय; अंतिम हेतू; आद्यतत्त्व : ‘जुन्या पक्षानें राष्ट्रीय सभेचे अंतिम हेतू किंवा क्रीड कायम ठरवून...’ - लोटिकेले ३·२६३. [इं.]

क्रीडणे

अक्रि.

खेळणे; मौज करणे; विलास करणे : ‘धन्य धन्य तें नंदाचे आंगण । जेथे क्रीडे मनमोहन ।’ - हरि ५·१७७. [सं. क्रीडा]

क्रीडन

न. स्त्री.

१. खेळ; मौज; विलास; लीला; मनोरंजन; करमणूक. २. परमार्थाखेरीजचा व्यवहार. ३. मैथुन; सुरत : ‘क्रीडा करो तुजसवें ललना पलंगीं ।’ - र ३.

क्रीडनकोप

पु.

प्रणयकोप; खोटा राग. [सं.]

क्रीडनकौतुक

न.

चित्तविनोद; करमणूक; गंमत. [सं.]

क्रीडनपाश

पु.

फासा; अक्ष (खेळण्याचा).

क्रीडनमार्ग

पु.

खेळातून शिक्षण. (प्राथमिक शिक्षण आ १९४८)

क्रीडनमृग

पु.

१. करमणुकीसाठी बाळगलेले जनावर (हरिण, वानर) : ‘पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा चले ।’ - ज्ञा ११·१७०. २. (ल.) काठीचा घोडा; खेळवणा. ३. दुसऱ्याच्या कह्यात वागणारा माणूस; ताटाखालचे मांजर; लाळघोट्या माणूस. [सं.]

क्रीडा

न. स्त्री.

१. खेळ; मौज; विलास; लीला; मनोरंजन; करमणूक. २. परमार्थाखेरीजचा व्यवहार. ३. मैथुन; सुरत : ‘क्रीडा करो तुजसवें ललना पलंगीं ।’ - र ३.

क्रीडांगण

न.

ज्या ठिकाणी क्रिकेट, खो खो, कबड्डी इ. मोठे उघड्यावरचे खेळ खेळले जातात असे मैदान किंवा मोकळी जागा. [सं.]

क्रीडाउपचार

पु.

(मानस.) मुलांच्या मानसशास्त्रातील एक प्रक्रिया. मुलांच्या खेळांच्या विषयावरून त्यांच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज बांधण्याची पद्धत.

क्रीडाकोप

पु.

प्रणयकोप; खोटा राग. [सं.]

क्रीडाकौतुक

न.

चित्तविनोद; करमणूक; गंमत. [सं.]

क्रीडापाश

पु.

फासा; अक्ष (खेळण्याचा).

क्रीडामृग

पु.

१. करमणुकीसाठी बाळगलेले जनावर (हरिण, वानर) : ‘पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा चले ।’ - ज्ञा ११·१७०. २. (ल.) काठीचा घोडा; खेळवणा. ३. दुसऱ्याच्या कह्यात वागणारा माणूस; ताटाखालचे मांजर; लाळघोट्या माणूस. [सं.]

क्रीडावृत्ति

स्त्री.

(मा.शा.) खेळण्याची उपजतबुद्धी, सहजप्रवृत्ती, स्वभाव.

क्रीडास्थान

न.

ज्या ठिकाणी क्रिकेट, खो खो, कबड्डी इ. मोठे उघड्यावरचे खेळ खेळले जातात असे मैदान किंवा मोकळी जागा. [सं.]

क्रीत

स्त्री.

क्रिया; कृती. [कृति अप.]

क्रीत

पु.

१. विकत घेतलेला मुलगा; बारा वारसांपैकी एक. २. दासांतील एक भेद.

क्रीत

वि.

विकत घेतलेले; खरेदी केलेले. २. विकलेले. [सं.]