शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

क्रूझर

न.

एक लढाऊ गलबत. आपल्या युद्धनौकांचे संरक्षणार्थ व शत्रूच्या युद्धनौकांच्या नाशार्थ युद्धकालात अशी गलबते ठेवतात. [इं.]

क्रूर

वि.

१. निर्दय; कठोर; कृपाहीन; निष्ठुर : ‘परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी ।’ - ज्ञा १६·२५७. २. भयंकर; उग्र; भीतिदायक. ३. प्रचंड; धडाक्याने जाणारी, वाढणारी (आग इ.). ४. अमानुष; फाजील; रानटी (वर्तन, कृत्य). ५. हिंसक; हिंस्त्र (प्राणी). [सं.]

क्रूस

पु.

१. वधस्तंभ. या खांबावर प्रभू येशूख्रिस्ताला खिळून मारले : ‘येशूला जेथें क्रूसावर खिळलें होतें तें ठिकाण शहराच्या जवळच होतें.’ - यौहा १९·२०. २. येशूख्रिस्ताचे मृत्युसूचक चिन्ह ✞. ख्रिस्ती धर्मचिन्ह. ३. आत्मयज्ञाची तयारी. ४. ख्रिस्ताबरोबर व ख्रिस्ताकरता दुः