शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

खि:

हसण्याचा आवाज. [ध्व.]

खिंकाट

वि.

प्रचंड : ‘करुनि खिंकाट गर्जना ।’ - मुआदि ३७·३६.

खिंकाळणे

अक्रि.

१. घोड्याचे ओरडणे; हिंसणे. २. मोठ्याने खोखो हसणे; मौजेने हीऽ हीऽ हसणे. [ध्व.]

खिंकावणे

अक्रि.

१. डसणे; चावणे : पहा : खिंकाळणे [ध्व.]

खिंखाळणे

अक्रि.

१. घोड्याचे ओरडणे; हिंसणे. २. मोठ्याने खोखो हसणे; मौजेने हीऽ हीऽ हसणे. [ध्व.]

खिंड

स्त्री.

१. दोन टेकड्यांतील किंवा डोंगरातील चिंचोळी वाट; अरुंद रस्ता; अडचणीचा रस्ता; दरी.२, भोक; वाट; दार; खिंडार; भगदाड (भिंत, कुंपण यातील). ३. गाळलेला भाग. (धड्यातील, ग्रंथातील). ४. (ल.) फट; सवड; पळवाट. ५. खांड (तलवार इत्यादींच्या पात्याच्या धारेवरील). (वा.) खिं

खिंड कुली

स्त्री. न.

१. दोन टेकड्यांमधील लहान खिंड. २. भिंत, कुंपण यातील लहान भगदाड, भेग, भोक.

खिंड कुले

स्त्री. न.

१. दोन टेकड्यांमधील लहान खिंड. २. भिंत, कुंपण यातील लहान भगदाड, भेग, भोक.

खिंडकबाळी

स्त्री.

बायकांचा कानातील एक दागिना; खिरणीबाळी.

खिंडगोंडी

स्त्री. अव.

गल्ल्या; बोळ; अरुंद रस्ते (घळी).

खिंडार

न.

मोठे भगदाड; भोकसा; भोक; दोन शेतांतील चिंचोळी वाट. २. भग्नावशेष; मोडकेतोडके, पडके घर, गाव वगैरे.

खिंडार

वि.

मोडकळीला आलेले; जमीनदोस्त झालेले (गाव, इमारत).

खिंडारे

न.

मोठे भगदाड; भोकसा; भोक; दोन शेतांतील चिंचोळी वाट. २. भग्नावशेष; मोडकेतोडके, पडके घर, गाव वगैरे.

खिंडारे

वि.

मोडकळीला आलेले; जमीनदोस्त झालेले (गाव, इमारत).

खिंडु कुली

स्त्री. न.

१. दोन टेकड्यांमधील लहान खिंड. २. भिंत, कुंपण यातील लहान भगदाड, भेग, भोक.

खिंडु कुले

स्त्री. न.

१. दोन टेकड्यांमधील लहान खिंड. २. भिंत, कुंपण यातील लहान भगदाड, भेग, भोक.

खिंडोर

स्त्री.

खिंडार; दरी; भगदाड; मोडकळीला आलेले घर : ‘तरी त्या खिंडोरा आंत । सदा दगडमाती राखत ।’ - एभा १३·१२८.

खिंव

स्त्री.

आलिंगन. (गो.) [सं. क्षेम]

खिउदा

स्त्री.

भूक : ‘म्हणे मज खिउदा लागली मोटी ।’ - क्रिपु १२·८०. [सं. क्षुधा]

खिओबणे

अक्रि.

खवळणे : ‘मग अब्राहावोंथें खिओबले ।’ - क्रिपु ८·७७. [सं. क्षोभ]