शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

खींच

वि.

गच्च. (गो.)

खींच्च

वि.

गच्च. (गो.)

खीच

स्त्री.

खिचडी : ‘मनपवनाची खीचपुरी । वाढूनियां ॥’ - ज्ञा १८·१०४०. पहा : खिच

खीचपुरी

स्त्री.

खिचडी : ‘मनपवनाची खीचपुरी । वाढूनियां ॥’ - ज्ञा १८·१०४०. पहा : खिच

खीचल

हस्तक्षेप; ढवळाढवळ.

खीचि

पु.

रगडा : ‘तेथ खीचि थोरि जाली ।’ - शिव ९५४, ९७२.

खीज

स्त्री.

रुसवा; चिरड; चीड; इतराजी. (क्रि. येणे.) [सं. खिद]

खीट

न.

१. गुरांच्या गळ्यात बांधलेली लाकडी घाट. २. लहान लाकडी खुंटी. पहा : खिटी

खीण

पु.

क्षण. (कु.) पहा : खिण [स. क्षण]

खीण

पु.

घट्टा; वण. (गो.) पहा : खिण [सं. किण]

खीदाराई

क्रि.

भात घालणे.

खीमा

पु.

खिरापतीसारखा किंवा त्याच्याही पेक्षा बारीक किसलेला पदार्थ पहा : खिमा [अर. कीमा]

खीर

स्त्री.

१. दुधात गव्हले - शेवया, तांदूळ, साखर इ. घालून आटवून केलेले पक्वान्न. गोमंतकात तांदुळाचे पीठ, गूळ वा रताळ्याचे तुकडे घालून खीर करतात. २. कण्हेरी [सं. क्षीर] (वा.) खिरीत तूप पडणे - चांगल्या पदार्थाशी दुसऱ्या चांगल्या पदार्थाचा संयोग होणे.

खीरम्या

वि.

उंची वस्त्र : ‘वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरट्याला ।’ - तुगा २४८२.

खीरारी

पु.

गवळी : ‘खीरारी एकु दाटुनि सीवारू चारी:’ - लीच १·२७.

खीळ

स्त्री.

१. दरवाजाला लावण्याचे लोखंडाचे किंवा लाकडाचे केलेले अडकण; अडसर; खुंटी; शंकू. २. शिडीच्या पायऱ्या. ३. लाकडाचा सांधा जोडण्यासाठी मारलेला खिळा. ४. खिळा. [सं. कीलक] (वा.) ॰ खीळ बसणे, खीळ घालणे - अडथळा आणणे. दात खीळ बसणे - दात एकमेकावर घट्ट बसून वाचा बंद होणे.

खीळ

स्त्री.

हाडांचा सांधा; खुबा. जसे :- कोपराची-ढोपराची-दाताची मनगटाची-पायाची खीळ. [सं. कीलक]

खीळ

स्त्री.

१. स्तनाग्रातील दुग्धप्रतिबंधक मळ. (क्रि. बसणे, फोडणे.) (वा.) ॰ खीळ फोडणे – जनावर व्याल्यानंतर त्याच्या आचळातून दुधाच्या चार धार काढणे. २. गळू अथवा खांडूक यांच्या तोंडावर जमलेली पुवाची गोळी, खडा. (व.) पहा : खिळा [सं. कीलक]

खीळ

स्त्री.

शिवळ. [सं. कीलक]