शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

खूंट

पु.

१. नांगराचे खोड; फाळ बसवण्याचे लाकूड. २. कोळसा. (को.)

खूंट

पु.

वेलीचा आधार, खांब. (कु.)

खूंब

पु. न.

लोक; राष्ट्र; देश; जात; कुल : ‘कानुकायदे अठरा खुंब जागे जागे चौथरे नेमून दिले.’ - मदरु १·२५. [फा. कौम]

खूजा

पु.

फिरकीचा तांब्या. (तंजा.)

खूट

पु.

१. नांगराचे खोड; फाळ बसवण्याचे लाकूड. २. कोळसा. (को.)

खूट

स्त्री.

१. खुंट; उसाच्या चरकाच्या मळसूत्री खांबाच्या बुडाचा भाग, जोड. २. उणीव; तूट; न्यूनता; वजनातील कमीपणा.

खूट

पु.

वेलीचा आधार, खांब. (कु.)

खूट आगूल

स्त्री.

मधली आगूल, नांगराला लावलेल्या बैलजोडीतील मधली जोडी. (व.)

खूड

न.

खुराडे : ‘आंधारिये घालवीति चकोर । खूडां पाडवीति सोगौर ।’ - रुस्व ५९६.

खूड

स्त्री.

झाडाचे (विशेषतः हरबरा) तोडलेले कोवळे शेंडे; शेंडे खुडण्याचे काम : ‘हरबऱ्याची खूड घरची बायामाणसे करतात.’ - गार ८७. (क्रि. करणे.)

खूण

स्त्री.

१. चिन्ह; ज्यावरून एखादी गोष्ट जाणली जाते किंवा समजली जाते ते लक्षण; ठिपका; निशाणी; व्यंजन; संकेतचिन्ह : ‘हळूच खुणें सांगतसे ।’ - नव १२·१८८. २. (विशेषतः) क्षेत्रसीमाचिन्ह; शीव. ३. संकेत; इशारा (डोके हालवणे, हातवारे, नेत्रसंकेत इ. क्रियेने दिलेला); सूचना;

खूणखाण

स्त्री.

खुणा, संकेत, मनोगत, सूचना, चिन्हे यांसाठी व्यापक शब्द. पहा : खूण

खूणगाठ

स्त्री.

१. (एखाद्या गोष्टीची) आठवण ठेवण्यासाठी वस्त्राला किंवा त्याच्या पदराला मारलेली गाठ. २. (ल.) खात्री. (वा.) खूणगाठ बांधून ठेवणे, खूणगाठ मारून ठेवणे - खात्री बाळगणे; पक्के समजणे.

खूणचिठ्ठी

स्त्री.

(ग्रंथ.) ग्रंथाला, पुस्तकाला खुणेसाठी लावलेली कागदाची, प्लॅस्टिकची पट्टी.

खूणमुद्रा

स्त्री.

इशारा, चिन्ह, निशाणी, मुद्रा, ठसा, अंक इ. मोघम शब्दांबद्दल व्यापक अर्थाने योजतात. एखादी खूण किंवा सर्व खुणा. पहा : खूण

खूद

पु.

ताडी ठेवण्याचे अरुंद गळ्याचे मडके.

खूद

क्रिवि.

खुद्द; स्वतः; खासगत इ. पहा : खुद्द

खून

स्त्री.

मासे पकडण्याचा बांबूच्या कामट्यांचा सापळा. हा मृदंगाच्या आकाराचा असतो. (कु.) पहा : खोइन

खून

पु.

१. मनुष्यवध; हत्या; घात; मनुष्याला ठार मारणे. २. रक्त, रक्तपात (या मूळ अर्थानेही योजतात.). ३. (कायदा) एखाद्या व्यक्तीला योजनापूर्वक कृत्य करून ठार मारणे. फा. (वा.) खून चढणे - मनुष्यवधामुळे उन्माद चढणे.

खूनखराबा

पु.

रक्तपात व नासधूस; लूट व धूळघाण, जाळपोळ इ.