शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

खेंक

स्त्री.

खोकला; ढास. (क्रि. लागणे.) (को.)

खेंकचे

अक्रि.

ओशाळणे. (गो.)

खेंगट

न.

अतिशय संताप : ‘करे आदय आपट । आलं अंगात खेंगट ।’ - बगा १२८.

खेंगट

न.

बोंबील, कोळंबी, झिंगे इ. माशांचा एकत्र केलेला ढीग.

खेंगटे

पहा : खेकटे, खेकटेखोर

खेंगटेखोर

पहा : खेकटे, खेकटेखोर

खेंगस

पु.

पाणलावा.

खेंगस ढाक

पु.

लहान सांबर.

खेंगाळा

पु.

तांबड्या जातीचा एक मासा.

खेंचकट

न.

गर्दी; गचडी; घणाई. (कु.)

खेंचकाम

न.

(मुद्रण) खिळे सरळ जुळविण्याचे काम.

खेंचणी

स्त्री.

१. घट्ट ओढणी. (क्रि. करणे, देणे.); जोराची, दांडगाईची ओढ. (क्रि. देणे, करणे.) २. (जरतार) परडी फिरविण्याचा वीतभर लांबीचा लाकडी दांडा.

खेंड

स्त्री.

गोल टोकाची व जड तरवार. पहा : खांड

खेंड

न.

गोवरीचा किंवा लाकडाचा पेटलेला तुकडा; निखारा : ‘एकाच डोळ्यात दारू भरलेलं इस्त्याचं खेंड.’ - गोता २६. (माण.) [सं. खंड]

खेंड

पहा : खिंडगोंडी, खिंडकुली, खिंडार

खेंडकुली

स्त्री.

१. बागेतील पाण्याचा लहान पाट : ‘खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम ।’ - एभा ७·५६३. २. वाकणे (वळणे) घेत जाणारी नदी; खेड्यातील ओढा : ‘साहित्याचियां खेडकुळिया ।’ - शिव २६. [सं. क्ष्वेड = वक्र + कुल्या = पाट, कालवा, ओढा]

खेंडकुली

स्त्री.

खेडवळ स्त्री.

खेंडकुळी

स्त्री.

१. बागेतील पाण्याचा लहान पाट : ‘खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम ।’ - एभा ७·५६३. २. वाकणे (वळणे) घेत जाणारी नदी; खेड्यातील ओढा : ‘साहित्याचियां खेडकुळिया ।’ - शिव २६. [सं. क्ष्वेड = वक्र + कुल्या = पाट, कालवा, ओढा]

खेंडगोंडी

पहा : खिंडगोंडी, खिंडकुली, खिंडार

खेंडा

पु.

हलक्या किमतीचे वस्त्र किंवा शेला : ‘एकी दिव्य वस्त्रें नेसल्या परिकर । मज खंडे जर्जर मिळालेसे ।’ - नाम.