शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

खो

पु.

१. (खोखोचा खेळ) डाव आलेला पकडणारा गडी रांगेतील गड्याला उठायला लावून त्याच्या जागी बसताना उच्चारतो तो शब्द. [सं. स्कुंभ] (वा.) खो घालणे, खो देणे - कामावरून घालवून देणे; (मर्जीतून) उखडणे; उच्चाटन करणे; युक्तीने जागा ताब्यात घेणे; (कामात) बिब्बा घालणे. खो मि

खो

स्त्री.

१. डोंगर; गुहा : ‘निरनिराळ्या खोमध्यें त्यांनीं वाघाच्या शिकारीसाठी कायमची व्यवस्था करून ठेविली होती.’ - एशिआ ३५६. [फा. कोह], २. खदखदा हसणे; खोकणे; ढास. (क्रि. लागणे, करणे, लावणे, चालणे.) : ‘छातीचें मडकें होई । खोखोचें मजरे घेई ।’ - सन्मित्रसमाज मेळा पद ४

खो

क्रिवि.

१. सपाटून; मोठमोठ्याने; खोखो असा आवाज काढीत. (क्रि. हसणे, खोकणे). २. तडा गेलेल्या मडक्यावर वाजविले असता होणाऱ्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन. (क्रि. वाजणे).

खोंकर

वि.

१. फुटके; तडकलेले; नाशवंत : ‘जें आकारीं इयें खोकरें ।’ - ज्ञा ८·१५; मोडकळीस आलेले : ‘रिता वाडा खोंकर ।’ - तुगा २०५५. २. वयातीत; जख्ख. [क. कोंके] [सं. क्षयकर]

खोंकरड

खोंकरे

खोंग

स्त्री.

लहान खड्डा : ‘त्याच भिवईवर कपाळात मोठी खोंग’ - गांधारी ११.

खोंगयी

स्त्री.

झरा; झिरप; पाट; चर : ‘माह्या घरामागे पान्याची खोंगयी ।’ - दपा २·४. (व.)

खोंगळ

पु. स्त्री.

१. खोदलेला पाट, कालवा; खंदक. २. पाण्याच्या लोंढ्याने केलेली घळ, ओघळ, चर : ‘मेलेले जनावर ओढून नेतात आणि जवळच नाल्यात अगर खोंगळीत टाकतात.’ - गांगा ६५.

खोंगळा

खोंगळी

खोंगा

पु.

तळहाताचा पसा, पोकळी.

खोंगी

स्त्री.

गुडघे व छाती यात डोके घालून बसण्याची क्रिया. (क्रि. करणे, घालणे, घालून बसणे). [क. कोंके]

खोंच

वि.

हलक्या किमतीचा; स्वस्त. (नंदभाषा)

खोंचर

पु.

खोचण्याचे, भोसकण्याचे एक शस्त्र; भाला, बरची इ. : ‘सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसें ।’ - ज्ञा १६·३४५.

खोंचरा

खोंचा

पु.

भातखाचराचा ताल घातलेला भाग; लहान खाचर. (को.)

खोंचार

पु.

खोचण्याचे, भोसकण्याचे एक शस्त्र; भाला, बरची इ. : ‘सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसें ।’ - ज्ञा १६·३४५.

खोंचारा

खोंचेरा

पु.

बिळातून साप बाहेर ओढून काढण्याचे दुटोकी हत्यार; चिमटा.