शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

पु.

१. मराठी वर्णमालेतील अठरावे अक्षर आणि तिसरे व्यंजन. २. गर्व; अहंमन्यता; वृथाभिमान. गर्व शब्दाचा संक्षेप. (वा.) ‘ग’ ची बाधा, पीडा होणे - गर्वाचा ताठा; गर्व : ‘श्रीची प्राप्ति झाली म्हणजे ‘ग’ ची बाधा व्हावयाचीच.’ - गुप्तमंजूष.

वि.

(समासात) १. गमन करणारा, जाणारा. जसे :- उरग- उराने, पोटाने जाणारा, सरपटणारा. २. पोचला आहे, दाखल झाला आहे असा; समाविष्ट; अंतर्वर्ती. जसे :- भूमिग, बुद्धिग, खग, जलग. [सं. गम्]

स्त्रीला उद्देशून वापरले जाणारे संबोधन. (अगे, गे याचे संक्षिप्त रूप.)

गँगरीन

काही कारणाने शरीरातील रक्तपुरवठा खंडित झाल्यास त्या भागातील पेशी निर्जिव होण्याची स्थिती.

गंगकड

क्रिवि.

दक्षिणेकडे. (व.)

गंगकोनी

वि.

गंगेकडून; गोदावरी नदीच्या बाजूने; उत्तरेकडून : ‘वारं सुटयेल सुटलं गंगकोनी ।’ - लोले ३८.

गंगथड

स्त्री.

गोदावरीच्या काठचा प्रदेश किंवा तीर. [सं. गंगातट]

गंगथडी

स्त्री.

गोदावरीच्या काठचा प्रदेश किंवा तीर. [सं. गंगातट]

गंगमुखी

वि.

गोदावरी नदीकडे तोंड केलेले; उत्तरेकडे तोंड केलेले.

गंगमोहरा

क्रिवि.

गोदावरीकडे, उत्तरेकडे (गोदा व कृष्णा यामधील). याचप्रमाणे पुढील दिशावाचक शब्द रूढ आहेत - राखेसमोहरा = (राक्षसांच्या दिशेकडे) = दक्षिणेकडे. खाली-खालता-खाललाकडे = पूर्वेकडे, वर-वरता - वरलाकडे = पश्चिमेकडे इ.

गंगमोहरी

क्रिवि.

गोदावरीकडे, उत्तरेकडे (गोदा व कृष्णा यामधील). याचप्रमाणे पुढील दिशावाचक शब्द रूढ आहेत - राखेसमोहरा = (राक्षसांच्या दिशेकडे) = दक्षिणेकडे. खाली-खालता-खाललाकडे = पूर्वेकडे, वर-वरता - वरलाकडे = पश्चिमेकडे इ.

गंगरणे

अक्रि.

चढून जाणे; गर्व होणे. (कु.)

गंगलेय

सोनसांवर.

गंगा

स्त्री.

१. गंगा (भागीरथी) नदी; तिचा दैवी अवतार (देवी); नदी देवता. २. गोदावरी नदी : ‘गंगातीरास येऊन रहावे.’ - ऐलेसं २६२३. ३. (सामा.) पवित्र नदी : ‘भवताली एक गंगा झुळझुळ वाहे ।’ - देप ९८. ४. पवित्र कार्याकरिता घेतलेले पवित्र नदी, झरा, कुंड यातील पाणी. [सं.] (वा.) ग

गंगागोत

न.

ग्रामपंचायत; जातगंगा (वादाच्या निकालासाठी जमलेली).

गंगाजम्नी

वि.

१. ज्याचा एक बाजूचा काठ एका रंगाचा व दुसऱ्या बाजूचा दुसऱ्या रंगाचा असतो असे (धोतर इ.). २. भिन्न व विसदृश वस्तूंचा समागम किंवा संयोग; मिश्र; संकरज : ‘परस्परविरोधी असे - इंग्रजी मराठी विचार एकत्र करून गंगाजम्नी पुस्तक करण्यापेक्षा... नवीनच पुस्तक लिहिणे बरे

गंगाजळी

स्त्री.

१. गंगा किंवा दुसऱ्या पवित्र नदीचे पाणी ठेवण्याचे पात्र. २. मोठा खजिना; कायम शिलकीचा खजिना; ज्या शिलकीला कधी हात लावायचा नाही ती शिल्लक (शिंदे सरकारच्या खजिन्याला गंगाजळी असे नाव आहे) : ‘पैशानें गच्च भरलेली गंगाजळी हातीं लागलीं.’ - संभाजी. ३. चलनी नोटा वट

गंगाद्वार

न.

१. त्र्यंबकेश्वरी असलेले गंगा प्रगट होण्याचे ठिकाण; गोदावरीचे उगमस्थान. २. हरद्वार (या ठिकाणी गंगा हिमालयावरून सपाट प्रदेशावर खाली उतरली आहे.).

गंगापाट

पु.

घोड्याच्या छातीवरील लांब केसांची गोम. ही शुभ मानतात. हिची काही लक्षणे वाईट असतात.

गंगापाठ

पु.

घोड्याच्या छातीवरील लांब केसांची गोम. ही शुभ मानतात. हिची काही लक्षणे वाईट असतात.