शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

गी

स्त्री.

वाणी; वाचा; वचन : ‘आठां पुत्रांतें दे राज्यें प्रभुवन करि सत्या गी ।’ – मोरा १·२०६. [सं.]

गीझर

पु.

(वि.) पाणी तापविण्याचे विजेवर, इंधनवायू (गॅस) वर, सौरशक्तीवर चालणारे साधन. [इं.]

गीडबीड

न.

एक वाद्य. पहा : गिरबिड : ‘दौडीची गीडबीडी दुटाळा ।’ – कृमुरा ६५·३०.

गीडबीडे

न.

एक वाद्य. पहा : गिरबिड : ‘दौडीची गीडबीडी दुटाळा ।’ – कृमुरा ६५·३०.

गीत

न.

१. गेय शब्दरचना : ‘गीतभाटीव तो श्रवणीं । कर्णजपु ॥’ – ज्ञा १७·२९७. गीतांचे प्रकार दोन - गांधर्व व गान. २. गाणे; पद : ‘सुखगीत नृत्य तेथें मजलाही तोच एक थारा हो ।’ – मोसभा १·३३. ३. गाणे म्हणणे; पद गाणे. ४. दळताना किंवा लग्नात म्हणतात त्या ओव्या. ५. पदाचा छं

गीत

वि.

गायिलेले; म्हटलेले. [सं. गै = गाणे] (वा.) नावे गीत गाणे – कोणी आपले कल्याण केले असता त्याच्या अपरोक्ष त्याची स्तुती करणे. गीत गाणे – १. दुसऱ्याजवळ आपली सर्व हकीगत सांगणे; रडगाणे लावणे. २. तेच तेच सांगणे; एकच धरून बसणे.

गीतकार

पु.

गीते रचणारा; पद्यलेखक; गाणी लिहिणारा.

गीतमात

न. स्त्री.

गायनादि कला; गाण्याच्या (संगीतातील) मात्रा, अंतरा, नियम वगैरे.

गीतमान

न. स्त्री.

गायनादि कला; गाण्याच्या (संगीतातील) मात्रा, अंतरा, नियम वगैरे.

गीतरचना

स्त्री.

विशेषतः चित्रपट, नाटक, ध्वनिमुद्रिका. इ. साठी चाल लावता येईल अशी गाणी लिहिणे : ‘चालीवर गीतरचना करण्याचें हें बंधन...’ – प्रभात १७.

गीतसाळ

स्त्री.

गायनशाळा : ‘गीतसाळ करी कुडी । किन्नरांची ।’ – उगी २२.

गीतसुड

पु.

पोवाडा; विजयगान : ‘तयाचा गाति गीतसुडु । किन्नर पर्वतीं ।’ – रुस्व २५८.

गीतस्वर

पु.

मधुर आवाज.

गीता

स्त्री.

तत्त्वविवेचनाचा पद्यात्मक संवादरूप ग्रंथ.

गीति

स्त्री.

१. एक छंद; आर्येचा एक प्रकार; मोरोपंती आर्या. याचे चार चरण असून पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रत्येकी मात्रा १२ व दुसऱ्या व चवथ्यात १८ मात्रा असतात. २. गाणे; गीत. [सं.]

गीती

स्त्री.

१. एक छंद; आर्येचा एक प्रकार; मोरोपंती आर्या. याचे चार चरण असून पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रत्येकी मात्रा १२ व दुसऱ्या व चवथ्यात १८ मात्रा असतात. २. गाणे; गीत. [सं.]

गीतोपयोगी नाद

(संगीत) ज्या नादात अखंडता, स्पष्टता व माधुर्य हे गुण तसेच प्रमाणबद्धता असते तो नाद.

गीद

न.

गिधाड : ‘घारें गिदें बहुतीं येकमेकांथे झोंबती ।’ – क्रिपु ३३·१५.

गीद

पु.

१. गिधाड : ‘करितां रामनामस्मरण । गीध भक्षण करूं न शके ।’ – भारा किष्किंधा १६·९०. २. घार. [सं. गृध]

गीध

न.

गिधाड : ‘घारें गिदें बहुतीं येकमेकांथे झोंबती ।’ – क्रिपु ३३·१५.