शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

गृगृहसंपत्ती

स्त्री.

१. गृहसौख्य; घर चांगले असण्याचे सौख्य. २. मोठा घर खटला; मोठे कुटुंब; मोठा परिवार.

गृध्र

पु.

१. गिधाड. २. (उप.) वृद्ध मनुष्य. गिधाडाला फार आयुष्य असते यावरून. [सं.]

गृध्रव्यूह

पु.

गिधाडे आपल्या भक्ष्याभोवती ज्याप्रकारे वेढा घालतात तशी सैन्यरचना : ‘गृध्रव्यूह सैन्य रचावे । गृध्रास देखून स्वभावे । गरुड नये त्या स्थळीं ।’ - जे १२·९३.

गृध्रावलीनक

न.

(नृत्य). पाय थोडा गुडघ्यात वाकवून पाठीमागे पसरणे व दोन्ही हात पुढे पसरणे.

गृह

न.

घर; सदन; आलय; आगर; मंदिर; मकान. [सं.]

गृहकच्छप

पु.

कासवाच्या पाठीच्या आकाराचा दगडी पाटा,खल.

गृहकलह

पु.

भाऊबंदकी; घरगुती तंटा; यादवी; अंतःकलह.

गृहकार्य

न.

(शिक्षण). १. पहा : गृहपाठ. २. पालकांनी मुलांवर टाकलेली जबाबदारी व त्यांना करायला सांगितलेले काम.

गृहकृत्य

न.

घरातील दैनंदिन कामे.

गृहखाते

न.

देशातील किंवा राज्यातील अंतर्गत सुव्यवस्था, कायद्याची अंमलबजावणी इ. कारभार पाहणारा सरकारी विभाग.

गृहछिद्र

न.

१. कुटुंबातील दोष, व्यंग, उणेपणा; खाजगी वाईट गोष्टी; वर्मेकर्मे. (क्रि. काढणे, बोलणे) : ‘श्रीमंतांच्या घरोघर दुराचार व गृहच्छिद्रें किती असतात हे जवळजवळच्या लोकांस तरी पूर्णपणें विदित असतें.’ - नि २. (ल.) घरातील फूट, भेद, बेबनाव; ज्यामुळे तिऱ्हाइताचा शिरक

गृहजात

पहा : गृहदास २

गृहजीवशास्त्र

न.

पाकक्रियादी संसारातील गोष्टींची माहिती.

गृहदास

पु.

१. घरातील चाकर, गुलाम. २. (हिंदुकायदा) दासीपुत्र.

गृहनौका

स्त्री.

शिकारा, हाऊसबोट.

गृहपाठ

पु.

शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना घरी करायला दिलेला अभ्यास.

गृहपाल

पु.

खानसामा; कोठावळा; वाकनीस.

गृहप्रवेश

पु.

१. नववधूने सासरी प्रथम प्रवेश करणे. २. नव्याने बांधलेल्या घरात राहायला जाणे.

गृहभंग

पु.

घर, कुटुंब, पेढी, मंडळी इ. ची फूट; वाताहत; नाश; मोड; घरादाराचा सत्यानाश. [सं.]

गृहभूमि

स्त्री.

घराची जागा.