शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

गे

उद्गा.

१. ‘अगे’ या संबोधनाचे संक्षिप्त रूप : ‘तो गे! तोचि राम सर्वत्र पाहे ।’ - राम २००. २. म्हशीला बोलावण्याचा शब्द. (व.)

गेंगडी

स्त्री.

वेंगडी; हातपाय लटपटणे; भयग्रस्त स्थिती; घाबरगुंडी. (व.)

गेंगणा

वि.

१. नाकात बोलणारा (माणूस). २. सानुनासिक, नाकातील (उच्चार).

गेंगणे

अक्रि.

नाकातून बोलणे. [सं. ङु.]

गेंगरणे

अक्रि.

१. पडशामुळे, थंडीमुळे नाकातून बोलणे. २. त्रेधा - तिरपीट उडणे; गांगरणे; अतिशय घाबरणे. [ध्व.]

गेंगाणा

वि.

१. नाकात बोलणारा (माणूस). २. सानुनासिक, नाकातील (उच्चार).

गेंगाणे

अक्रि.

नाकातून बोलणे. [सं. ङु.]

गेंगाणेपण

न.

नाकातून बोलण्याची सवय.

गेंगाण्या

वि.

१. नाकात बोलणारा (माणूस). २. सानुनासिक, नाकातील (उच्चार).

गेंगारणे

अक्रि.

१. पडशामुळे, थंडीमुळे नाकातून बोलणे. २. त्रेधा - तिरपीट उडणे; गांगरणे; अतिशय घाबरणे. [ध्व.]

गेंजी

स्त्री.

कोंबड्याचा तुरा : ‘गेंजी नराची ताठ व मादीची पडलेली व डोकें मोठें असतें.’ - ज्ञाको क ७६६.

गेंझट

वि.

अतिशय लोचट, हट्टी, दुराग्रही, चेंगट (माणूस).

गेंझा

वि.

अतिशय लोचट, हट्टी, दुराग्रही, चेंगट (माणूस).

गेंडकणे

अक्रि.

गदरणे; पाडाला येणे, लागणे (आंबा, फळ).

गेंडरू

गांडूळ. [सं. गंडोल]

गेंडऱ्या

वि.

बारीक.

गेंडा

पु.

१. नाकावर शिंग असणारा, जाड व टणक कातडीचा एक वन्य पशू. [सं. गंड], २. जनावराच्या गळ्यातील गोंडेदार दोर. पहा : गेठण, गेठा २. (व.)

गेंडुर

गांडूळ. [सं. गंडोल]

गेंडोर

पु.

गाणारा किडा. (झाडी.)

गेंद

पु.

१. तुरा; झुबका; गोंडा (फुलांचा). २. पुष्कळशा पाकळ्यांचे फूल (झेंडू, बटमोगरा इ. चे). मात्र अशा फुलाचे नाव गेंद शब्दाच्या पुढे जोडतात. जसे : - गेंदमोगरा, गेंदकाटेशेवंती इ. ३. झेंडूचे फूल. ४. घोड्याच्या लेंडीवरील रेशमाची किंवा चांदीची फुले किंवा मुदा. ५. बाय