शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

गै

पहा : गई, गईगोळा

गैंब

पु.

गुरांनी केलेल्या नासाडीची नुकसानभरपाई करून देणारे खाते. (गो.) [पोर्तु.]

गैगुदर

स्त्री.

दुर्लक्ष; चालढकल : ‘दाणे मागितले तुम्ही गैगुदर करिता.’ - पेसाप ६३.

गैगोळा

पहा : गई, गईगोळा

गैदी

वि.

१. ढिला; नेभळा; गबाळ्या; अजागळ; बावळा; अव्यवस्थित. २. आळशी; टोणपा. पहा : गावदी [फा. गइब]

गैदीपणा

पु.

गचाळपणा; आळस व अस्वच्छपणा.

गैप

क्रिवि.

१. गुप्त; न दिसणारा; गायब; अदृश्य : ‘गैबचि होऊनि जाती ।’ - दावि २९५; ‘त्यातच गैबत जाले. त्यांचा मुर्दा देखिल दृष्टीनें कोणी देखिला नाही.’ - भाब ६३. २. नष्ट; गहाळ. [फा. गइब, गइबत]

गैब

गैबत

ईर्षा; पराक्रम.

गैबति

१. देशाची अवस्था. २. दूर राहून नोकरी.

गैबती

वि.

१. ढिला; नेभळा; गबाळ्या; अजागळ; बावळा; अव्यवस्थित. २. आळशी; टोणपा. पहा : गावदी [फा. गइब]

गैबती

क्रिवि.

१. गुप्त; न दिसणारा; गायब; अदृश्य : ‘गैबचि होऊनि जाती ।’ - दावि २९५; ‘त्यातच गैबत जाले. त्यांचा मुर्दा देखिल दृष्टीनें कोणी देखिला नाही.’ - भाब ६३. २. नष्ट; गहाळ. [फा. गइब, गइबत]

गैबती

स्त्री.

१. धूपारतीचा तेलाच्या भांड्यासह बुदलीवजा दिवा. (राजा.), २. गैरहुजूर नोकरी; मालकाच्या सन्निध न झालेली, न होणारी नोकरी.

गैबती

वि.

अलाहिदा; फालतू; कुणीतरी; अपरिचित; भलताच. (गो.)

गैबत्या

वि.

१. ढिला; नेभळा; गबाळ्या; अजागळ; बावळा; अव्यवस्थित. २. आळशी; टोणपा. पहा : गावदी [फा. गइब]

गैबान्या

गैबी

१. गुप्त; गूढ. २. निनावी.

गैबी आवाज

पु.

आकाशवाणी; दैवी, गुप्त संदेश.