शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

गो

उद्गार.

अगो; अगे. (बंगालीतही हे संबोधन आहे.) : ‘असे कायगो करतेस?’ - कफा १. (को.)

गो

स्त्री.

१. गाय. २. बैल (पशू). समासात - गाईपासून झालेले; गाईसंबंधी (दूध, चामडे, मांस इ.) : ‘अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।’ - ज्ञा २·१८४. [सं.]

गो

पु.

इंद्रिय; वाचा.

गो दिव्य

गाईचे शेपूट हातात धरून साक्ष देण्याचा एक जुना शपथेचा प्रकार.

गो-मसूरिका

स्त्री.

गायीच्या सडांना येणाऱ्या देवी. [सं.]

गोंग

स्त्री.

खोटी ओरड; खोटा आरोप; तोहमत : ‘एखादा महार हाताशीं धरून त्याजकडून खोटीखरी बनावट शिवाशिवीची गोंग करून या पंचावर आणतां येईल.’ – के ५.९.१९४१. [ध्व.] (वा.) गोंग उठणे –ओरडा होणे : ‘पिंपरणीच्या बुंध्याआड उभा राहिलो आणि आवाज टाकणार तोच गोंग उठली.’–व्यंमाक ६१. गोंग

गोंगटा

पु.

ओरडा : ‘गोंगटा ऐकून ते धावतच आले.’–माजीगा ६४.

गोंगणे

अक्रि.

गुंग् असा आवाज करणे; सणाणणे (तीर, हवाईबाण). [ध्व.]

गोंगरण

न.

जेर होईपर्यंत द्यायचा मार; मारठोक, शिव्या वगैरे; बेदम मारहाण.

गोंगरणे

अक्रि.

गांगरणे; धांदरणे; घाबरणे.

गोंगराण

न.

जेर होईपर्यंत द्यायचा मार; मारठोक, शिव्या वगैरे; बेदम मारहाण.

गोंगल्ल

न.

गर्द झाडी. (गो.)

गोंगाट

पु.

१. गलका; बडबड; आरडाओरड. २. गो गो असा आवाज (माशी, बाण वगैरेंचा). ३. गुप्त गोष्टीची प्रसिद्धी; बोभाटा.

गोंगाणी

स्त्री.

माशांचा गुणगुण असा आवाज : ‘उठली माशांची गोंगाणी ।’–एरुस्व १४¿६६. [ध्व.]

गोंगावणे

अक्रि.

१. गो गो असा आवाज करणे; घोंघावणे (माशा वगैरे). २. बाण, बंदुकीची गोळी वगैरेंनी विशिष्ट आवाज करणे. ३. बुक्क्यांनी मारले असताना गों गों असा आवाज काढणे. [ध्व.]

गोंज

न.

एक प्रकारचे कारल्याचे पंचामृत, तोंडी लावणे. (को.) २. उडदाच्या पिठाचे डांगर. (व.) [क. गोज्जु]

गोंजरणे

सक्रि.

१. अंजारणे−गोंजारणे; अंगावरून प्रेमाने हात फिरविणे (समजाविण्याकरिता, फसविण्याकरिता); कुरवाळणे; समजूत पाडणे. २. माया लावणे. (माण.)

गोंजारणे

सक्रि.

१. अंजारणे−गोंजारणे; अंगावरून प्रेमाने हात फिरविणे (समजाविण्याकरिता, फसविण्याकरिता); कुरवाळणे; समजूत पाडणे. २. माया लावणे. (माण.)

गोंड

स्त्री.

न. १. पाणंद; गल्ली (गाव किंवा कुंपणातील). (को.) २. घोळ; खेंडुलकी; खिंड; अरुंद रस्ता; डोंगरातील गायवाट किंवा जनावरांची पाऊलवाट. [क. गोंदी]

गोंड

पु. न.

१. दाण्यावरचे टरफल; कचोळे; तुरमणे (काही वनस्पतींचे, नागली वगैरेचे). २. वर टरफल असलेले धान्य. (माण.)