शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

ग्रंथ

पु.

१. अर्थपूर्ण वाक्यांची विशिष्ट प्रकारची संगतवार रचना; पोथी, पुस्तक (गद्य किंवा पद्य यांचे). २. (ल. व शब्दशः) गुंफणी; जुळवणी; जोडणी; संपादणी. ३. पुस्तक; भाग; अध्याय; परिच्छेद इ. ४. बत्तीस अक्षरांचे वृत्त किंवा वृत्ताची ओळ : ‘व्यासकृत महाभारत लक्षग्रंथ प्रस

ग्रंथकर्ता

पु.

पुस्तक तयार करणारा, रचणारा कवी; लेखक.

ग्रंथकार

पु.

पुस्तक तयार करणारा, रचणारा कवी; लेखक.

ग्रंथणे

उक्रि.

१. अर्थानुसंधानपूर्वक अनेक वाक्ये एकत्र गुंफणे, बांधणे, जुळवणे, रचणे (पद्य, कविता); ग्रंथरचना करणे, ग्रंथ संपादणे : ‘जें मी संजात ग्रंथलों देख । आचार्यें कीं ॥’ – ज्ञा १८¿१७७०; २. गुंफणे; ओवणे (पुष्पादी). ३. एकत्रित करणे; जुळवणे. [सं. ग्रथन]

ग्रंथदिंडी

स्त्री.

१. (विशेषतः) साहित्य सम्मेलन प्रसंगी महत्त्वाच्या ग्रंथांची पालखीतून काढलेली शोभा यात्रा. २. दिंडीपताका; प्रभात फेरी; मिरवणूक

ग्रंथन

न.

गुंफण; जुडण; बांधणी; रचना : ‘आणि माझें तव आघवें । ग्रथन येणेचि भावें ।’ –ज्ञा १३¿३२९. [सं.]

ग्रंथन

न.

क्रि. ओवणे; विणणे; जोडणे; गोवणे; गुंफणे.

ग्रंथपंचक

न.

(ख्रि.) पवित्रशास्त्रातील पहिली पाच पुस्तके. ही मोशे याने लिहिल्याचे मानतात.

ग्रंथपाल

पु.

(ग्रंथ) ग्रंथालयाचा प्रमुख अधिकारी. ग्रंथांची व्यवस्था ठेवणारी व ग्रंथालयाचा कारभार पाहणारी व्यक्ती.

ग्रंथप्रस्ताव

पु.

ग्रंथाचा प्रारंभ.

ग्रंथप्रामाण्य

न.

धार्मिक किंवा कायद्यांच्या ग्रंथात लिहिलेले प्रमाण, आधारभूत किंवा खरे मानणे : ‘बुद्धिस्वातंत्र्याच्या ऐवजी ग्रंथप्रामाण्य… हे समाजनियमनाचे आधार होते.’ –शिलेसं (प्र.) ३३.

ग्रंथरूपदर्शन

न.

(ग्रंथ.) ग्रंथांची पृष्ठे, चित्रे, नकाशे, आकार. माहिती.

ग्रंथसाहेब

पु.

शिखांचा धर्मग्रंथ.

ग्रंथसूचिकार

पु.

(ग्रंथ.) ग्रंथसूचीचा कर्ता, संकलक, संपादक. ग्रंथांची, वर्णक्रमानुसार यादी तयार करणारी व्यक्ती.

ग्रंथसूची

स्त्री.

पुस्तके, नियतकालिके, अहवाल इत्यादिकांची वर्णक्रमानुसार केलेली यादी.

ग्रंथायंत

न.

ग्रंथाचा मूलभूत हेतू किंवा ध्येय : ‘आणि माझे तंव आघवें । ग्रंथायंत एणेचि भावें । जें तुम्ही संती होआवें । -ज्ञा १३¿३२८.

ग्रंथालय

न.

१. ग्रंथ, पुस्तके, नियतकालिके इ. वाचनासाठी किंवा अभ्यासासाठी जेथे ठेवली जातात असे ठिकाण. २. निरनिराळ्या प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह. ३. चित्रपट, चित्रपट्टी, ध्वनिमुद्रिका, ध्वनिपट्टीका इत्यादींचा संग्रह.

ग्रंथालयशास्त्र

न.

(ग्रंथ.) ग्रंथालयांच्या व्यवस्थापनाचे शास्त्र.

ग्रंथिक

वि.

गाठीचा; ज्यात अंगावर गाठी उठतात असा (रोग).

ग्रंथिक संन्निपात

ज्या तापात सांध्याच्या जागी गाठ येते असा ताप, ज्वर; प्लेग : ‘मुंबईतील भयंकर साथीचा ताप ब्युबानिक फीव्हर किंवा ग्रंथिक सन्निपात…’ –लोटिकेले १¿१¿५७४.