शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

ग्रांथिक

वि.

१. ग्रंथासंबंधी; ग्रंथात आढळलेले; लेखी. २. गुंफलेला; ओवलेला; रचलेला. [सं. ग्रंथ, ग्रथ]

ग्रानाईट

पु.

एक प्रकारचा दगड. यात स्फटिक, चंद्रकांत व अभ्रक हे भिन्न प्रमाणात मिश्रित असतात. हा दगड फार कठीण व टिकाऊ असतो. हिंदुस्थानात पुष्कळ ठिकाणी हा सापडतो. [इं.]

ग्राफाइट

न.

(भूशा.) कार्बनचा स्फटिकरूपातील अत्यंत मृदू प्रकार.

ग्राम

पु.

१. गाव; खेडे. २. गावातील प्रमुख किंवा माननीय माणूस. ३. अरेराव, कचाट्या, जरब बसविणारा, कचाटीत धरणारा माणूस. ४. जमाव; समुदाय : ‘मुतेहिना ऐसा वागे । ग्राम कर्मेदियांचा ।’ –यथादि ३¿९२. (समासात) इंद्रिय – गुण – पुण्य – भूत – स्वर - ग्राम : ‘इंद्रियग्रामावरी ये

ग्राम पंचायत

स्त्री.

गावची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था; ग्रामस्वराज्य. राज्यशासनाच्या कायद्यान्वये गावच्या लोकांनी निवडून दिलेली विशिष्ट अधिकार असलेली संस्था.

ग्राम संस्था

स्त्री.

गावची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था; ग्रामस्वराज्य. राज्यशासनाच्या कायद्यान्वये गावच्या लोकांनी निवडून दिलेली विशिष्ट अधिकार असलेली संस्था.

ग्राम सभा

स्त्री.

गावची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था; ग्रामस्वराज्य. राज्यशासनाच्या कायद्यान्वये गावच्या लोकांनी निवडून दिलेली विशिष्ट अधिकार असलेली संस्था.

ग्रामकंटक

पु. स्त्री.

गावगुंड; गावची पीडा, ब्याद; दुष्ट माणूस.

ग्रामकी

स्त्री.

गावजोशी किंवा पाटील इ. चे काम; गावकी.

ग्रामकुठार

पु. स्त्री.

गावगुंड; गावची पीडा, ब्याद; दुष्ट माणूस.

ग्रामकेसरी

पु.

१. गावातील कुत्रे : ‘ह्या ग्रामसिंहाचिया ठायीं । -ज्ञा १३¿६८१. २. (उप.) भेदरट माणूस; गावात फुशारकी मारणारा.

ग्रामकोळ

पु.

गावडुकर : ‘या ग्रामकोळाचा ठाइ । जैसा मिळणी ठाओ नाहीं ।’ –ज्ञा १३¿६७९.

ग्रामखर्च

पु.

१. गावचा खर्च. २. फुकट किंवा विनाकारण खर्च; ज्याचा मोबदला नाही असा खर्च.

ग्रामचर

वि.

असभ्य गोष्टींची आवड असणारा.

ग्रामजाति

स्त्री.

वर्ज्यावर्ज्य स्वरांवरून ठरविलेला रागांचा विभाग : ‘श्रुति स्वर ग्रामजाति –गमक ।’ –रुस्व ३४६.

ग्रामजोशी

पु.

गावचा जोशी. हा पंचांग सांगणे, पत्रिका पाहणे, मुहूर्त काढणे इ. कामे करतो : ‘आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ॥’ –तुगा.

ग्रामज्य

न.

शरीरसुख; मैथुन; सुरत क्रीडा : ‘ग्रामज्य आठवे चित्तीं ।’ –दास. २¿५¿२८.

ग्रामज्योतिषी

पु.

गावचा जोशी. हा पंचांग सांगणे, पत्रिका पाहणे, मुहूर्त काढणे इ. कामे करतो : ‘आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ॥’ –तुगा.

ग्रामणी

पु.

१. पाटील; गावाचा मुख्य. २. (लौकिक) गावगुंड, चावट, वाईट, कुटाळ्या, पीडादायक माणूस; ब्याद : ‘रामनामें विवर्जित ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत ।’ –एभा ८¿१६९. ३. गावचा महार. ४. ज्या व्यक्तीवर ग्रामण्य म्हणजे बहिष्कार घातला आहे अशी व्यक्ती : ‘ब्राह्मण्य धर्म

ग्रामणी

स्त्री.

कुटाळकी; गावकी. पहा : ग्रामिणी : ‘आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।’ –दास २¿३¿६.