शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

ग्रीदाग्रीदी

क्रिवि.

पहाऱ्या पहाऱ्याने : ‘राखणाईत ग्रीदाग्रीदी राखत होते ।’-गोच ७४.

ग्रीबा

पु.

भोपळा : ‘मातुळग्रामीं ग्रीबा खाववणें’ – स्थापो ९१.

ग्रीवा

स्त्री.

१. गळ्याच्या पाठीमागील बाजू; (सामा.) मान. २. कंठ; गळा : ‘उदासीन जातो ग्रिवा दाटताहे ।’-राक १९५. [सं.]

ग्रीवाघंटा

स्त्री.

१. गळ्याची घाट, गळ्यावरील डेरा. २. घुमट ठेवण्यासाठी भिंतीवर बांधलेल्या गोल बैठकीचा आकार : ‘उपरी सोळावा अध्यावो । तो ग्रीवेघंटेचा आवो ।’ –ज्ञा १८¿४०.

ग्रीवास्थान

न.

खड्‍ग; तलवारीचा एक प्रकार. [सं.]

ग्रीष्म

पु.

ज्येष्ठ आषाढ असा दोन महिन्यांचा काळ; उन्हाळा : ‘नातरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता ।’-ज्ञा २¿३५९.

ग्रीष्मर्तु

पु.

ज्येष्ठ आषाढ असा दोन महिन्यांचा काळ; उन्हाळा : ‘नातरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता ।’-ज्ञा २¿३५९.

ग्रीष्मर्तू

पु.

ज्येष्ठ आषाढ असा दोन महिन्यांचा काळ; उन्हाळा : ‘नातरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता ।’-ज्ञा २¿३५९.