शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

मराठी वर्णमालेमधील एकोणिसावे अक्षर आणि चौथे व्यंजन.

घंगरघोळ

पु.

घोटाळा; भानगड: ‘असा सगळा घंगरघोळ झाला होता.’ –मक (१९६०) २९.

घंगाट

पु.

सोसाटा. पहा: घोंगाट

घंगाळ

न.

१. कडक थंडी; गारठा. (क्रि. पडणे, सुटणे.), २. पहा : गंगाळ [सं. गंगालय]

घंगाळटोपले

पहा: गंगाळपोते, गंगाळटोपले

घंगाळपोते

पहा: गंगाळपोते, गंगाळटोपले

घंघाट

पु.

घणघणाट: ‘तुझे गायेन घंघाटाचे: बरवे नव्हे’ –पंचो १५४·१८.

घंघाळ

न.

पहा: गंगाळ [सं. गंगालय]

घंघाळ

वि.

भयंकर: ‘घंघाळ शंखाखें ।’ –गरा १०३.

घंघाळटोपले

पहा: गंगाळपोते, गंगाळटोपले

घंघाळपोते

पहा: गंगाळपोते, गंगाळटोपले

घंघाळी

स्त्री.

एका जातीची माशी; गोमाशी. (को.) [ध्व. घं]

घंटा

स्त्री.

१. एक वाद्यविशेष; घाट. ही काशाची केलेली असून ती ओतीव असते. हिचा आकार मोठ्या पेल्यासारखा असून वरच्या बाजूला मोठी दोरी ओवण्यासाठी कडी असते. आतल्या बाजूला पोकळीमध्ये (आवाज, नाद निघण्याकरिता) लोखंडी, लाकडी लोळी लावतात. काहींना वरच्या बाजूला धरण्याकरिता मूठ बस

घंटा

पु.

१. तास; तासाचा अवधी. (व. खा.), २. अभाव; नकारघंटा.

घंटाघोष

पु.

१. घंटेचा आवाज. २. (ल.) गाजावाजा; बोभाटा; प्रसिद्धी. ३. कंठशोष; कानीकपाळी ओरडणे: ‘इकडील सेवकपणाचा भारीपणें घंटाघोष करून संतोषवर्तमान लेहून पाठविणे.’ –इसंग्राम सरदार १७.

घंटातरंग

पु.

निरनिराळ्या सप्तस्वरयुक्त घंटांची माळ करून तिच्यावर जलतरंगाप्रमाणे विशिष्ट राग वाजवणे. [सं.]

घंटापथ

पु.

(ज्यावरून गळ्यात घंटा असलेले बैल येत-जात आहेत असा) हमरस्ता; राजमार्ग; रहदारीचा रस्ता. [सं.]

घंटापळी

स्त्री.

जेवण्याचे पितळेचे भांडे. (माण.)

घंटापारधी

पु.

घंटानादाने हरिणास भुलवून फासात अडकविणारा पारधी: ‘घंटापारधी जैसा । मधुर नादें मृगमानसा । भुलवोनियां पाडी फांसा ।’ –भारा, बाल, २·२६.

घंटाबडव्या

वि.

(तुच्छतेने) पुजारी; पूजा करणारा: ‘कृष्णरावांच्या पदरीं गोविंदपंत नुसता घंटाबडव्या होता.’ –कोरकि ३५.