शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

घाँगा

पु.

(मुलांच्या भाषेत) बागुलबोवा. (गो.)

घाँटॉ

पु.

दाणे, तंबाखू इत्यादिकांत आढळणारा किडा. (गो.)

घाँशॅ

पु.

लहान मुलांच्या पोटात होणारा एक विकार. (गो.)

घांग

स्त्री.

१. दखलगिरी; सावधानता; जाणीव. (क्रि. ठेवणे. राखणे, धरणे, असणे, राहणे.) : ‘त्याला मेजवानीची घांगही नव्हती.’ – अस्तंभा १३५. २. आठवण; सई; स्मरण; याद (क्रि. येणे, आठवणे) दोन्ही अर्थी सामान्यतः अकरणरूपी प्रयोग करतात. (तंजा.)

घांग

वि.

१. काही एका गोष्टीविषयी अंगी सामर्थ्य असून रडण्याचा स्वभाव असलेला (मनुष्य); रड्या; कोणी पैसा मागितला असताना, काम करायला सांगितले असताना नाकारणारा; माघार घेणारा; रडगाणे गाणारा. २. रडवा; थोड्याशा इजेने मोठी आरडाओरडा करणारा. (को.)

घांगचाळे

पु.

अव. १. (पैसा देण्याविषयी, काम करण्याविषयी अक्षमतेबद्दल) कुरकुर; पिरपिर; रडगाणे. २. (थोडासा धक्का लागल्याने दुबळ्या, अशक्त प्राण्याचे) केविलवाणे व मोठ्याने आक्रोश करणे; किंकाळी.

घांगरणे

अक्रि.

घाबरून, गांगरून जाणे; भयभीत होणे; घोटाळणे; भांबावणे. [सं. गर्ह > गागर्ह = गांगरणे]

घांगशा

पु.

गोंधळ; कटकट; वाद; घोळ; तंटा; बखेडा : ‘घांगशा घालीत आहों. निर्गम आज्ञेप्रमाणे होईल.’ –पेद ३३·३७४. [ध्व.]

घांगा

क्रिवि.

धो धो पाण्याने भरून : ‘पाणी वरून पडतें जमिनी गेल्या घांगा ।’ – वलो २१.

घांगावणे

अक्रि.

भीतीने गांगरून, गोंधळून जाणे; सुचेनासे होणे; भांबावणे; गांगरणे : ‘तैशीच घागाइली तियें एकें वेळें ।’ – भाए ३३२. (व.)

घांगुसणे

अक्रि.

चाचपडणे : ‘दृष्टी जाऊनि निःशेख । अंध जाला घांगुसे ।’ – मआदि २·४२. [सं. घृष्]

घांगूड

पु.

फुलातील गड्डा, कंद (ज्याला पाकळ्या फुटलेल्या असतात तो); (कमळाच्या) पाकळ्या गळाल्यानंतर राहिलेला गड्डा, दांडा. (को.)

घांगोसणे

उक्रि.

१. घासाघीस करणे. २. बारकाईने शोधणे; चिकित्सापूर्वक छाननी करणे : ‘जे मना आकळितां कुवाडें । घांघुसितां बुद्धी नातुडे ।’ – ज्ञा ५·६७.

घांघरणे

पहा : घांगरणे

घांघवसणे

सक्रि.

शोध करणे : ‘जें मना कलितां कुवाडें । घांघवसिता बुद्धी नातुडे ।’ – राजा ५·६७.

घांघुसणे

उक्रि.

१. घासाघीस करणे. २. बारकाईने शोधणे; चिकित्सापूर्वक छाननी करणे : ‘जे मना आकळितां कुवाडें । घांघुसितां बुद्धी नातुडे ।’ – ज्ञा ५·६७.

घांघोसणे

उक्रि.

१. घासाघीस करणे. २. बारकाईने शोधणे; चिकित्सापूर्वक छाननी करणे : ‘जे मना आकळितां कुवाडें । घांघुसितां बुद्धी नातुडे ।’ – ज्ञा ५·६७.

घांची

पु.

तेली.

घांट

स्त्री.

घंटा : ‘ऐसीया महात्मेयांचां कपाळी घाली घाट.’ – लीचउ ५१.

घांटॉ

पु.

पाच हात लांबीचे एक जुने माप. (गो.)