शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

घुंग

पु.

भुंगा; भ्रमर : ‘तळ्यांत म्हैस बसली होती. तिच्या शिंगात घुंग होऊन धाकटा मुलगा जाऊन बसला.’ – मसाप १·२·२२. [ध्व.] [सं. ङु]

घुंगट

पु.

डोक्यावरून, तोंडावरून आच्छादनार्थ घेतलेले वस्त्र, कपडा; बुरखा. (वा.) घुंगटमुंडी घालणे – तोंड झाकणे. [हिं. घुंघट]

घुंगर

पु. न.

घागरी. हा धातूचा, पोकळ असून आत खडा घातलेला असतो, त्यामुळे आवाज होतो. ह्याचा आकार करवंदाएवढा गोल असतो. याच्या वरच्या बाजूला दोरा ओवण्याजोगी कडी, नाक असते. [हिं. घुंघरू]

घुंगरटे

न.

चिलट; मच्छर; केंबरे; डास. पहा : घुंगरूट

घुंगरा

पु.

एका टोकाला घुंगरू बांधलेली काठी. हिचा ताल धरण्यासाठी उपयोग होतो. (ना.)

घुंगरावणे

अक्रि.

१. (प्रां.) चिडून, संतापून (एखाद्याच्या) वसकन् अंगावर येणे; (एखाद्यावर) तुटून पडणे. २. धुडकावणे.

घुंगरू

न.

रेशमाची एक जात.

घुंगरू

पु. न.

घागरी. हा धातूचा, पोकळ असून आत खडा घातलेला असतो, त्यामुळे आवाज होतो. ह्याचा आकार करवंदाएवढा गोल असतो. याच्या वरच्या बाजूला दोरा ओवण्याजोगी कडी, नाक असते. [हिं. घुंघरू]

घुंगरूट

न.

१. चिलट; मच्छर; केंबरे; (लहान) डास : ‘घुंगर्डी म्हणती आमुचे घर । निश्चयेंसी ॥’ – दास १·१०·४१. २. (ल.) लहान मुलगा; अगदी लहान व अशक्त मनुष्य; क्षुद्र माणूस. [क. गुंगुरू = माशी]

घुंगर्डे

घुंगस

पु.

तटबंदी असलेल्या शहराच्या, गावाच्या वेशीबाहेर असणारा कोट, बाह्यकोट.

घुंगार

पु.

कोणताही पदार्थ विशेषतः मांस इ. मऊसर शिजल्यावर खाली उतरून थंड होऊ देतात. थंड झाल्यावर त्याचे कोंडाळे करून त्यात एक निखारा ठेवतात आणि त्यावर तूप ओतून लागलीच भांड्यावर झाकण ठेवतात. या कृतीला घुंगार असे म्हणतात. [क्रि. देणे]

घुंगुट

पु.

डोक्यावरून, तोंडावरून आच्छादनार्थ घेतलेले वस्त्र, कपडा; बुरखा. (वा.) घुंगटमुंडी घालणे – तोंड झाकणे. [हिं. घुंघट]

घुंगुटपट

पु.

बुरखा; बुरख्याचे वस्त्र.

घुंगुर

पहा : घुंगरू : ‘होती नाद निघे सुमंजु हलती जीं कांचिचीं घुंगुरें ।’ – कमं. २·६८.

घुंगुर

पहा : घुंगरटे : ‘घुंगुरडा ऐसे वदन । म्हणे पर्वत सगळा ग्रासीन ।’ – ३५·१०·९.

घुंगुरकेश

पु.

(अव.) कुरळे केस.

घुंगुरगडे

न.

१. चिलट; मच्छर; केंबरे; (लहान) डास : ‘घुंगर्डी म्हणती आमुचे घर । निश्चयेंसी ॥’ – दास १·१०·४१. २. (ल.) लहान मुलगा; अगदी लहान व अशक्त मनुष्य; क्षुद्र माणूस. [क. गुंगुरू = माशी]

घुंगुरटे

घुंगुरडे

न.

मच्छर, डास, कीटक वगैरे. [का. गुगड]