शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

घृणा

स्त्री.

१. वीट; तिरस्कार. २. दया; करुणा. [सं.]

घृणास्पद

वि.

कंटाळा, वीट येण्यासारखे; किळसवाणे; तिरस्करणीय.

घृणी

वि.

दयाळू; कृपावंत; दयार्द्र; मायाळू; कनवाळू; करुणाशील. [सं.]

घृत

न.

तूप; आज्य : ‘अथवा इंद्रियें आणि प्राण हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ॥’ – ज्ञा ९·२४०. [सं.]

घृतकुमारी

स्त्री.

कोरफड; कुमारी; कुवारकांडे; कुवारी. [सं.]

घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या

स्त्री.

१. (तुपाचे पाट व मधाचे पाट) तूप व गोड पदार्थ यांची चंगळ, रेलचेल, समृद्धी. २. (ल.) मिष्टान्नाचे सुग्रास व चमचमीत भोजन : ‘पुराणांचा शिमगा जेव्हापासून सुरू झाला व भटांच्या घृतकुल्या मधुकुल्या देशांत प्रवृत्त झाल्या तेव्हापासून… कौशल्य चट सारें पार वाहून गेले

घृतधेनु

स्त्री.

तुपाच्या गोळ्याला गाय समजून पूजा करून ब्राह्मणाला दान करायचा गोळा. [सं.]

घृतधेनू

स्त्री.

तुपाच्या गोळ्याला गाय समजून पूजा करून ब्राह्मणाला दान करायचा गोळा. [सं.]

घृतबुद्धि

स्त्री.

बुद्धीचा जडपणा; मंदबुद्धी; जडबुद्धी; बुद्धीची ग्रहणशक्ती तीव्र नसणे. (पाण्यात तुपाचा थेंब थिजतो किंवा फार हळूहळू पसरतो यावरून).

घृतबुद्धि

वि.

मंदबुद्धीचा; तल्लख बुद्धी, ग्रहणशक्ती नसणारा. [सं.]

घृतबुद्धी

स्त्री.

बुद्धीचा जडपणा; मंदबुद्धी; जडबुद्धी; बुद्धीची ग्रहणशक्ती तीव्र नसणे. (पाण्यात तुपाचा थेंब थिजतो किंवा फार हळूहळू पसरतो यावरून).

घृतबुद्धी

वि.

मंदबुद्धीचा; तल्लख बुद्धी, ग्रहणशक्ती नसणारा. [सं.]

घृतविपाक

पु.

(रसा.) तूप खतखतणे, फसफसणे, रासायनिक प्रक्रिया होणे : ‘साखरेचा दुग्धविपाक व नंतर घृतविपाक होऊं देऊन…’ – सेंपु. २·५·४.

घृतश्राद्ध

न.

तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने घराहून निघताना करायचे श्राद्ध. यातील मुख्य द्रव्य घृत (तूप) असते म्हणून याला हे नाव आहे. [सं.]

घृतस्नानी

वि.

पानावर तूप वाढल्यानंतर स्नान करणारा; स्नान केल्याबरोबर खायला बसणारा; जेवण तयार होईपर्यंत स्नान न करणारा.

घृताम्ल

न.

(रसा.) गाईच्या लोण्यात असलेले एक अम्ल. कॉडलिव्हर ऑईल तसेच दुसऱ्या काही प्रकारच्या चरबीत व काही उद्भिज्ज कोटीतही हे सापडते.

घृष्ट

वि.

घासलेले; चोळलेले; घर्षण पावलेले. [सं.]

घृष्टतल

न.

घोड्याच्या पायाला होणारा एक रोग. हा घोड्याच्या खुरांचे तळवे अधिक घासले गेल्याने होतो. – अश्वप २·३८.

घृष्टि

स्त्री.

१. घर्षण; घासणे : ‘का दोहीं काष्ठाचिये घष्टी । माजीं वन्हि एक उठी ।’ – ज्ञा १८·११५९. २. (ल.) संसर्ग; स्पर्श; सहवास; संघटन; घसट : ‘काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहें ॥’ – ज्ञा. १७·५१. [सं.]

घृष्टी