शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

घो

वि.

घाबरलेला, हुल्ला. – (तंजा.)

घो

पु.

१. नवरा. २. पुरुष. (राजा. को. बे. गो.) पहा : गोहो

घो घो

१. समुद्र, वारा, नदीचा प्रवाह, पूर इत्यादिकांचा आवाज, गर्जना : ‘घो घो शब्दें पूर चालला ।’ – नगंर (नवनीत ४२५). २. एखाद्या पदार्थाभोवती जमणाऱ्या माशांच्या थव्याचा आवाज. ३. धबधबा. (गो.)

घो घो

क्रिवि

१. प्रचंड लाटा, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस यांच्या गर्जनेप्रमाणे आवाज करीत, होत. २. (मनुष्यांच्या घोळक्याच्या) गोंगाटाच्या, गलबल्याच्या, गलक्याच्या आवाजाप्रमाणे; खूप खेचाखेचीने; (माणसे इ. कांनी) गजबजत; पेव फुटल्याप्रमाणे घोंगावत. पहा : घवघवा, घवघव [ध्व

घों

उद्गा.

सोसाट्याचा वारा, समुद्राच्या लाटा इ. कांचा मोठा आवाज : ‘आणिक श्रीकृष्णांचे बोलणें । घों करी आलें श्रवणें ।’ – ज्ञा ९·५३१.

घोंग

न.

सोंग; वेष : ‘नंदालयीं बाळक घोंग त्याचें । ब्रह्मादिकां दुर्लभ सोंग त्याचें ।’ – सारुह १·६०.

घोंगट

न.

१. तोंडावरून घेतलेले वस्त्र; बुरखा. पहा : घुंगट. २. (ल.) भरलेले आभाळ, पाऊस डवरून आलेले आकाश. (क्रि. घालणे.) [सं. गुठ् – गुंठन] (वा.) घोंगट घालणे, घोंगाट घालणे, घोंघट घालणे – रुसणे. ३. घों घों असा आवाज करणाऱ्या, घोंगावणाऱ्या माशांचा समुदाय; गोंगाट. ४. घुंग

घोंगड

न.

कांबळे; घोंगडे. (व.)

घोंगडगुंची

स्त्री.

पाऊस निवारण्यासाठी वापरायची घोंगड्याची खोळ. (बे.)

घोंगडबाऊ

पु.

द्वाड मुलांना भिवविणारा घोंगडे पांघरलेला मनुष्य; बागुलबोवा.

घोंगडी

स्त्री.

न. १. कांबळ्याची एक पट्टी; दोन घोंगड्या उभ्या शिवून जोडल्या असता कांबळा होतो : ‘येरे घोंगडीच्या पांघरणारा । गाई वळणारा ।’ – भज ६३. २. कर्नाटकी कांबळ्यासारखी, पांढरी, भारी, किंमती घोंगडी. [क. गोंगडि]

घोंगडे

स्त्री.

न. १. कांबळ्याची एक पट्टी; दोन घोंगड्या उभ्या शिवून जोडल्या असता कांबळा होतो : ‘येरे घोंगडीच्या पांघरणारा । गाई वळणारा ।’ – भज ६३. २. कर्नाटकी कांबळ्यासारखी, पांढरी, भारी, किंमती घोंगडी. [क. गोंगडि]

घोंगडे

न.

१. लचांड; लोढणे; पायखोडाबेडी; दुस्सह, दुर्वाह्य, परंतु करणे अवश्य असलेले काम इ. २. (शिव्या देऊन, धक्के मारून, उपहास करून एखाद्याची केलेली) फजिती; त्रेधा; हबेलंडी; दुर्दशा. (वा.) घोंगडे गळ्यात येणे, पडणे – एखादे लचांड मागे लागणे. घोंगडे भिजत ठेवणे, पडणे –

घोंगड्या

वि.

१. (ल.) गरीब कामकरी, मजूर. २. काळ्या रंगाचा मोठा (सुरवंट).

घोंगण

न.

१. गुरफटून घेतलेली स्थिती. २. गोळा केलेला कचरा; गळ्हाटा; राडा; खळमळ; घाण; खिचडी (अशा वस्तूवर माशा घों घों करतात त्यावरून).

घोंगणा

पहा : घोळणा, घोळाणा

घोंगणे

अक्रि.

१. घों घों असा आवाज करणे; गर्जणे (वारा, लाटा इ. नी). २. घोंगावणे; घों घों आवाज करणे (माशा इ. नी). ३. एकत्र जमणें; गर्दी, गिल्ला करणे. [ध्व. घों घों]

घोंगणे

पहा : घोघेणे

घोंगता

पु. स्त्री. न.

१. घोंगडी रुंदीच्या बाजूने दुमडून एका बाजूस शिवून केलेली खोळ. (क्रि. घेणे.) २. (लहान मुलांची) कुंची; एक प्रकारचा झगा. (कु.) पहा : घोंगशी

घोंगती

पु. स्त्री. न.

१. घोंगडी रुंदीच्या बाजूने दुमडून एका बाजूस शिवून केलेली खोळ. (क्रि. घेणे.) २. (लहान मुलांची) कुंची; एक प्रकारचा झगा. (कु.) पहा : घोंगशी