शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कचोळ

न. पु.

१. एकाला एक लागून तीन घरे व वर पेला असलेले एक लहान पूजेचे उपकरण (पंचामृत ठेवण्याकरिता); गंधाक्षतपात्र; एक पूजापात्र : ‘उगेंचे हातीं मिरवी कचोळें’ – सारुह ७·९०. २. वर्तुळाकृती बसलेले लोक; कोचाळे. ३. चौफुला. ४. फुलांचे आच्छादन : ‘कनक कमळांचा कचोळा । कीजे पर

कचोळा

कचोळे

कंचोळे

कचोळी

स्त्री.

सोने इत्यादी धातूंची देवाची मूर्ती. (गो.)

कचॉ

पु.

१. ठिपकेदार लहान मासा; लहान ढोमेले मासा. २. (सामा.) लहान पोर, मूल (मनुष्य जनावर, पक्षी इत्यादींचे). (गो.)

कचॉ

वि.

लहान; काचा.

कचो

कच्च

पु.

खाच; लहान खळगा (लाकूड वगैरेवर चाकू, रंधा वगैरेंनी पडणारा). [का. कच्चु = काच, वण]

कच्चा

वि.

१. न पिकलेला; हिरवा; कोवळा (फळ, गळू, पान इ.). २. साफसूफ न केलेला; ओबडधोबड (दगड, चित्र इ.). ३. न शिजलेला (भात, भाकरी, रसायन इ.). ४. अपुरा वा पक्का न केलेला; सरासरीचा, ठोकळ (जमाखर्च, काम इ.). ५. अपूर्ण; अपक्व; अप्रौढ (कट, मसलत इ.). ६. अपुरे समजलेले किंवा मि

कच्चा असामी

हंगामी, उपरी शेतकरी − मालक; ज्याचा कब्जा कायमचा नाही असा इसम.

कच्चा अंमल

पगार घेऊन केलेली सरकारी (जिल्ह्याची, तालुक्याची) नोकरी, काम. पहा : कच्चा मोकद्दमा, कच्चा १७

कच्चा आकार

ठोकळ हिशेब, अंदाज; साधारण आढावा.

कच्चा करवड

माशाचा एक प्रकार, याचा रस्सा करतात.

कच्चा कागद

खळ न लावलेला कागद.

कच्चा खर्डा

१. अंदाजपत्रक; बजेट (हिशेबाचे); पक्का करण्यापूर्वीचा पहिला खर्डा. २. कुलकर्ण्याने शेतकऱ्यांकडून आलेल्या रकमांचा ठेवलेला हिशेब.

कच्चा खाना

पोळ्या, डाळभात, खिचडी इ. न तळलेले जिन्नस.

कच्चा डाग

शिसे, जस्त किंवा कथील यांनी दिलेला डाग (चांदीचा नव्हे); तात्पुरता जोड; कस्तर करणे.

कच्चा तोळा

९२ गुंजांचा तोळा. पक्का तोळा ९६ गुंजांचा असतो. (कर.)