शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कच्चा दगड

(पुरा.) मऊ, पांढरा चुनखडीचा दगड. हा आतील कोरीव कामासाठी वापरतात.

कच्चा पक्का

वि.

अंदाजी, ठोकळ आणि त्यावरून केलेला पक्का हे दोन्ही ज्यात आहेत असा (जमाखर्च, वही, खतावणी इ.).

कच्चा पाढा

ठोकळ, तोंडी, त्रोटक, ठाकठीक न केलेली, कच्ची हकीगत, वर्तमान, साधन. (क्रि. वाचणे.)

कच्चा बटवडा

इसमवार पगारवाटणी (सरकारी नोकर किंवा मजूर यांना); दरडोईपगार.

कच्चा भरणा

रयतेने भरलेला सारा, वसूल (ऐन किंवा नक्त.).

कच्चा मामला

पहा : कच्चा अंमल

कच्ची मामलत

पहा : कच्चा अंमल

कच्चा मोकद्दमा

कामामध्ये नफातोटा होईल तो धन्याच्या वाट्याला अशा बोलीने केलेले काम, गुमास्तेगिरी; कच्चा अंमल.

कच्चा रंग

तिफाशी सोंगट्याच्या खेळात काळा अथवा हिरवा रंग.

कच्चा वसूल

रयतेकडून आलेला परंतु ज्याची वर्गवारी काढलेली नाही असा सारा, खंड.

कच्चा शेर

प्रमाणभूत (पक्क्या) शेरापेक्षा कमी असणारा शेर; १५ रुपये भारांचा शेर. उलट पक्का ८० भारांचा शेर. (कर.)

कच्ची

स्त्री.

(तिफाशी सोंगट्यांत). १. मेलेली पण नुकतीच जिवंत केलेली, नुकतीच बसविलेली सोंगटी; पट फिरून न आलेली सोंगटी. २. हिरवी किंवा काळी सोंगटी. तिफाशी सोंगट्यात तांबडा व पिवळा यांना पक्का आणि हिरवा व काळा यांना कच्चा रंग अशा संज्ञा आहेत. ३. (ल.) फजिती; मानहानी; अपकीर

कच्ची

पु.

कच्छवासी दुकानदार. (झाडी)

कच्ची असामी

दिवाळे वाजलेला किंवा अपुरी साधने असलेला, नालायक सावकार, कंत्राटदार, कूळ, अर्जदार, खंडकरी इ.

कच्ची कमाविशी

तैनात घेऊन सारावसुलीचे काम; नफातोटा धन्याचा अशा बोलीने मामलत वगैरे करायचा प्रकार; कच्चा अंमल.

कच्ची कमावीस

तैनात घेऊन सारावसुलीचे काम; नफातोटा धन्याचा अशा बोलीने मामलत वगैरे करायचा प्रकार; कच्चा अंमल.

कच्चीकारी

स्त्री.

नक्षी : ‘घुमटांत कच्चीकारी केली आहे.’ – ज्ञाको २०·१९१.

कच्ची कुंदी

१. कपडा भट्टीत न घालता नुसता धुऊन केलेली थंडी इस्त्री. २. धुतलेल्या कपड्यांना खळ न लावता केलेली इस्त्री.

कच्ची कैद

१. चौकशीपूर्वीची किंवा अपराध शाबीत होण्यापूर्वीची कैद. २. नजरकैद; साधी कैद.

कच्चीखोर

पु.

सदोदित फजिती किंवा पच्ची होणारा; फजितखोर.