शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कच्ची जप्ती

(कायदा) दाव्याचा निकाल लागण्यापूर्वी केलेली जप्ती.

कच्ची जमाबंदी

(खर्च वेगळा काढून तो वजा न घालता) एकूण आलेली गावची जमा.

कच्चीबच्ची

न. अव.

अगदी लहान मुले; लेकरेबाळे; चिल्लीपिल्ली.

कच्ची बाजू

(सोंगट्यांचा खेळ) तिफाशी डावात काळ्या व हिरव्या सोंगट्या.

कच्ची बुटी

सोनेरी किंवा रुपेरी रंगाने कापडावर काढतात ती बूट, फुले, खडी.

कच्ची बुटी

वि.

अशा कापडाचे (पागोटे, अंगरखा इ.); खडीदार.

कच्ची माती

कोरडी, चिकटपणा नसणारी माती.

कच्ची मिती

मारवाडी, सावकार यांनी कर्जाऊ दिलेल्या रकमेच्या वर घातलेली आदल्या दिवशीची तारीख. कुळाकडून आलेल्या रकमेची तारीख मात्र दुसऱ्या दिवशीची घालतात.

कच्ची मुदत

१. (सावकारी) हुंडी हातात पडल्यानंतर अमुक दिवसांत ती वटविली पाहिजे अशा प्रकारची दिलेली मुदत. २. हुंडीची ठरावीक मुदत भरण्यापूर्वीचा काल; अद्याप संपायच्या मुदतीचा काळ.

कच्ची लढाई

पुरा निकाल न होता झालेले युद्ध; दोन्ही पक्षांनी सोडून दिलेली लढाई; अनिर्णित लढाई.

कच्ची वहिवाट

कुलकर्ण्याने लिहून पाटलाची सही घेतलेली जमाखर्चाची पावती; कच्ची पावती.

कच्ची वीट

भट्टीत न भाजता उन्हात वाळवलेली मातीची वीट.

कच्ची शाई

लाख न मिसळलेली, पाण्याने निघून जाण्यासारखी शाई.

कच्ची सुपारी

न शिजवलेली सुपारी; पोफळ; रोठा.

कच्ची हुंडी

अद्याप न पटलेली किंवा न स्वीकारलेली हुंडी.

कच्चे अक्षर

खराब व बिनकित्त्याचे अक्षर; वळण नसलेले अक्षर.

कच्चे अंडे

नवीन घातलेले अंडे; ताजे अंडे; न उकडलेले अंडे.

कच्चे इरसाल

जिल्ह्यातून सरकारी खजिन्यात पाठविलेला शेतसाऱ्याचा भरणा.

कच्चे दूध

१ न तापवलेले, निरसे दूध. २. नवीन व्यालेल्या जनावराचे पहिल्या बारा दिवसांतील दूध; कोवळे दूध.

कच्चे नाणे

चलनी नाण्यांत आलेला सरकारी वसूल. यांत निरनिराळी नाणी सरभेसळ आलेली असतात.