शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कचदिशी

क्रिवि.

काच, मडके इ. फुटताना होणाऱ्या आवाजाचा अनुनादक; ताडकन; खाड्‌दिशी; जोराने, एकदम (पोटात शस्त्र खुपसणे, हाताखाली खडा सापडणे). (क्रि. फुटणे) [ध्व.] [क. कचु, कच्चणे]

कचकय

पु.

आंबाडे शिजवून केलेला पदार्थ. (गो.) पहा : कोचकई

कचकरणे

पहा : कचकणे

कचकल

पु. न.

१. फुटक्या मडक्याचा खालचा अर्धा भाग. २. रास; ढीग (काचेच्या तुकड्यांचा, बांगड्यांचा किंवा इतर वस्तूंचा). अनेक पदार्थांच्या तुकड्यांचा समुदाय; काचेचे तुकडे. (राजा.)

कचकुल

पु. न.

१. फुटक्या मडक्याचा खालचा अर्धा भाग. २. रास; ढीग (काचेच्या तुकड्यांचा, बांगड्यांचा किंवा इतर वस्तूंचा). अनेक पदार्थांच्या तुकड्यांचा समुदाय; काचेचे तुकडे. (राजा.)

कचकोल

पु. न.

१. फुटक्या मडक्याचा खालचा अर्धा भाग. २. रास; ढीग (काचेच्या तुकड्यांचा, बांगड्यांचा किंवा इतर वस्तूंचा). अनेक पदार्थांच्या तुकड्यांचा समुदाय; काचेचे तुकडे. (राजा.)

कचकल

काही कच्च्या फळांचा कठीण गर; बीजगर्भ; गाभा.

कचका

पु.

१. तलवार किंवा काठी यांचा जोराचा वार, मार, घाव, टोला : ‘दोहो हातांनी कचका दिला । बेंबीपावता चिरित नेला ।’ – ऐपो ६०. २. एकदम व जोराचा हिसका; ओढ. ३. जोर; बळ; आवेश; कामाचा धबडगा, सपाटा, झपाटा : ‘तिला शेतीच्या कचक्यात घातले.’ – आआशे ३३. ४. निष्काळजीपणाने, धसम

कचकाडी

स्त्री.

(बायकी) लपंडाव, छापो इ. खेळांत तीन मुली चकायला लागल्यावर सर्वांचे हात पालथे अगर उताणे पडले तर कचकाडी म्हणून पुन्हा चकावे लागते त्याला म्हणतात.

कचकावणे

अक्रि.

१. जोराने बांधणे; खेचणे (ओझे, गाठोडे, भारा इ.). २. मारणे; ठोकणे; खरडपट्टी काढणे; (जोराजोराने व मोठ्याने) शिव्या देणे. ३. सपाट्याने लागणे; उरकण्याच्या पाठीला लागणे (काम, धंदा, व्यापार इ.) ४. एकदम जोराने हिसका मारणे; हसडणे; कचकणे. ५. ठासणे; चोंदणे; ठाकूनठोक

कचकाविणे

कचकावून

क्रिवि.

प्रत्येक क्रियापदाशी – विशेषतः जेथे शक्ती, उत्साह, चापल्य, जोर दाखवायचा असतो तेथे जोडतात; सर्व शक्ती खर्च करून; जिवापाड मेहनत करून; खूप; अतिशय. (क्रि. बांधणे; खाणे; मारणे इ.) [सं. कच्, का. कच + कन्ने]

कचकून

कचकोडा

पु.

अगदीच कच्चे फळ; दोडा; कोवळे फळ. (ना.)

कचक्या

वि.

१. खुमखुमी जिरविणारा; जोरदार; हिंमतदार; धीट; साहसी; अधिक बलवान; वरचढ; शक्तिमान; अतिशय ताकदवान; दुसऱ्याला दाबात ठेवण्यासाठी तीव्र उपाय योजण्यास मागेपुढे न पाहणारा; खमक्या. २. सपाट्याने काम करणारा; तडफदार; चटचट कामे उरकणारा; चलाख.

कचखडी

स्त्री.

(इमारतकाम) सामान्य खडीपेक्षाही बारीक खडी; अर्धा इंच जाडीची खडी.

कचखाऊ

वि.

माघार घेणारा; भित्रा : ‘वक्त्याने कचखाऊ वृत्तीने वागू नये.’ – वक्तृत्व १३१.

कचडे

न.

(ज्याच्या वरील भाग फुटला आहे असा) भांड्याचा वा घागरीचा खालचा भाग; बिनतोंडी भांडे. पहा : कचकल

कचणी

स्त्री.

१. गिरमीट फिरविण्याची धनुकली. (कु.) २. आवळून बांधलेली दोरी : ‘त्या झाडाचा बुंधा कचण्यांनी भरून गेला.’ – बारी १०७. ३. पहा : कसणी. ४. घाव मारल्याने पडणारी भेग.

कचणे

अक्रि.

१. खेळासाठी तयार होणे. [सं. कच्], २. कचरणे. पहा : कचकणे [ध्व.]