शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कचणे

क्रि.

विटा तयार करणे. (झाडी) [सं.]

कचदिल

वि.

१. कुटिल. २. कच्च्या मनाचा; भित्रा; संशयी; कमकुवत; कचखाऊ; दुबळा; अशक्त; भेकड : ‘मराठे इतके पळपुटे व कचदिल होते.’ – मागोवा १९२. [का. कच्+दिल]

कचनार

स्त्री.

एक सुंगधी वनस्पती. याच्या फुलांची भाजी सुंदर होते : ‘ पाच दवणा मरवा कचनार ।’ – अफला ४९. [सं. कांचनार]

कचनारी

क्रिवि.

कचकन (चावणे). (झाडी)

कचपाश

पु.

१. डोक्यावरचे केस; कच. २. केसांचा पाश, फास. (क्रि. घालणे.) [सं.] (वा.) कचपाश घालणे – केसाने गळा कापणे; विश्वासघात करणे

कचमच

क्रिवि.

कचकच असताना (रेव लागल्यामुळे येणारी चव, आवाज). [ध्व.]

कचमचा

क्रिवि.

कचकच असताना (रेव लागल्यामुळे येणारी चव, आवाज). [ध्व.]

कचमा

पु.

१. गढूळपणा (पाण्याचा, दारूचा); रेंदाळपणा. २. सबगोलंकार; गोंधळ; घोटाळा; अव्यवस्थितपणा; गर्दी (अन्न, कामधंदा, माणसे, गुरे इत्यादींची). ३. घाण; केरकचरा; गवतकाडी.

कचमोडा

वि.

धैर्य नसणारा; कच खाणारा; भित्रा; भेकड; कच्च्या दिलाचा; अवसानघातकी (माणूस).

कचमोहरे

वि.

कच खाल्लेले; बिनहिमतीचे (माणूस) : ‘मार दिला त्यामुळे लोक कचमोहरे जाले.’ – पया ४३१.

कचर

स्त्री.

१. तळ्यात लव्हाळ्याच्या मुळाशी उगवणारा एक सुपारीएवढा कंद. हा उपासाला खातात. हा चिकट व गोड असतो; फुरडी. (को. व.) [सं. कसेरु], २. खिळे ठोकण्यासाठी भिंतीत बसविलेले लाकूड, ठोकळा, फळी. (गो.), ३. कच; माघार : ‘आपली मंडळी इतकी असून अशा कचाटीच्या जागेतसुद्धा त्यान

कचर

न.

वाढ खुंटलेले विड्याचे पान. (गो.)

कचर कचर

क्रिवि.

कचकच. (झाडी) [का. कचु]

कचरट

वि.

१ लवकर तुकडा पडणारा; ठिसूळ (पदार्थ). २. (ल.) अशक्त; कुचकामाचे; हलकट (माणूस, पशू, वस्त्र इ.) : ‘हिरवटासी दुरी धरावें । कचरटासीं न बोलावें ॥’ – दास ११·५·२१. [सं. कच्चर = दुष्ट, कुत्सित]

कचरट

पहा : कचखाऊ

कचरट

न.

कचरा; घाण.

कचरट

वि.

घाणीचे. [सं. कच्चर = वाईट, घाण]

कचरणे

अक्रि.

कच खाणे. पहा : कचकणे : ‘त्यांनी असे सांगितल्यावर माझे मन जरा कचरले.’ – पलको ३७४.

कचरणे

अकर्तृक क्रि.

(उचकी वगैरेमुळे) घशाशी येणे (अन्न वगैरे).

कचरपट्टी

स्त्री.

१. बांगड्या तयार करणारावर बसविलेली पट्टी. २. जेथे आजूबाजूच्या घरातला, गावातला कचरा टाकतात अशी जागा; गलिच्छ, घाणेरडी जागा, वस्ती : ‘ते बापडे बायकापोरांना घेऊन धारावीच्या कचरपट्टीत शिरले.’ – माखा १७.