शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कचरा

पु.

१. घाण; केर; लाकूड वगैरेचे बारीक तुकडे; गाळसाळ. २. उकिरडा; उकिरड्यावरील घाण; (सामा.) टाकाऊ गोष्ट; निरुपयोगी वस्तू. ३. (ल.) बिनलढाऊ लोक : ‘सैन्याबरोबरचा बाजार, उदमी लोक वगैरे कचरा.’ – ऐपो २३२ वरील टीप. [सं. कच्चर = मलिन त. शक्‍रू] (वा.) कचरापिचका होणे – भं

कचरा

वि.

तांदळाची एक जात.

कचरा

पु. स्त्री.

१. हे एक सुगंधी झाड असून याचे कंद अंगाला लावतात. २. काळी हळद. पहा : कचोरा [सं. कर्चूर]

कचरी

पु. स्त्री.

१. हे एक सुगंधी झाड असून याचे कंद अंगाला लावतात. २. काळी हळद. पहा : कचोरा [सं. कर्चूर]

कखरा

पु.

खाच किंवा खोबण पाडण्याचे सुताराचे एक हत्यार.

खचरा

पु.

खाच किंवा खोबण पाडण्याचे सुताराचे एक हत्यार.

कचराभट्टी

स्त्री.

कचरा जाळून टाकण्यासाठी तयार केलेली जागा, भट्टी.

कचरी

स्त्री.

फळाचे किंवा भाजीचे काप, फोडी.

काचरी

स्त्री.

फळाचे किंवा भाजीचे काप, फोडी.

कचरी सुपारी

पहा : खांडकापी सुपारी

काचरी सुपारी

पहा : खांडकापी सुपारी

कचऱ्याल

न.

फडताळ. (कु.)

कचलपट

वि.

कच खाणारा; कच्च्या दिलाचा; भित्रा; भेकड.

कचला

पहा : कचोरा

कचली

पु.

कोरीव काम करणारा; दगडात अक्षरे खोदणारा.

कचवचणे

पहा : कचरणे : ‘ती असा अंगुपती कारभार करायला कचवचायची.’ – रैत १४३.

कचवा

पु.

१. एक वाद्य : ‘सतार, कचवा, सरोद आणि सार मंडळ वाजविणारे.’ – (बडोदे) कलावंत खाते ४९. पहा : कछवा, २. जहाज : ‘आर्य लोकांची एक मोठी टोळी कचव्यातून बंदरावर येऊन उतरली.’ – जोफु ६६. कची हा गलबताचा एक प्रकार आहे.

कचंबणे

उक्रि.

१. ढवळणे; गढूळ करणे; रेंदाळणे (हात, पाय इत्यादिकांचा स्पर्श करून पाणी वगैरे). २. हाताळणे; चिवडणे; राड करणे (अन्न). [सं. कश्मल]

कचमळणे

उक्रि.

१. ढवळणे; गढूळ करणे; रेंदाळणे (हात, पाय इत्यादिकांचा स्पर्श करून पाणी वगैरे). २. हाताळणे; चिवडणे; राड करणे (अन्न). [सं. कश्मल]

कचंबणे

अक्रि.

(पोटात) खळाळणे; कालवणे; पोट बिघडणे.