शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कचक

स्त्री.

१. हाणाहाणी; मारामारी; चकमक; तंटा (काठ्या, तरवारी इत्यादींनी – यात कचकच असा ध्वनी निघतो यावरून). (क्रि उडणे, झडणे.) २. (रोगाची) शिणक; शिळक; चमक; उसण. (क्रि. भरणे.) ३. आकस्मिक धक्का. ४. भीती; दहशत. (व.) पहा : कच (क्रि. खाणे.) वि. अवाढव्य; जंगी; अजस्त्र; प्

कचकच

स्त्री.

१. पिंगळा, करकोचा यांचे ओरडणे. २. रेव किंवा रेवाळ पदार्थ दातांखाली सापडल्याने होणारा आवाज. ३. अशी रेव, रेती, खडे, कण. ४. (ल.) कटकट; वाद; तंटा; भांडण; त्रास; पिरपीर : ‘वृथा कचकच वाढविली ।’ – एभा २८·५८३. ५. बडबड; जल्पना; गप्पा : ‘शब्द कचकच वाढविती ।’ – एभा

कचकच

क्रिवि.

कचकच आवाज करीत (खाणे, चावणे); मोठ्याने आरडाओरड करून (भांडणे). [ध्व.]

कचकचा

क्रिवि.

कचकच आवाज करीत (खाणे, चावणे); मोठ्याने आरडाओरड करून (भांडणे). [ध्व.]

कचकचणी

स्त्री.

कचकच लागेल, होईल अशी स्थिती; अर्धकच्चेपणा. (गो.)

कचकचणे

अक्रि.

१. कचकच आवाज करणे; २. दात चावणे, खाणे, वाजणे. ३. कटकट करणे; त्रास होईल अशाप्रकारे बडबडत राहणे. [सं. कच्]

कचकचा

क्रिवि.

गपागप खाणे. (झाडी) [क. कुच्]

कचकचो

क्रिवि.

गपागप खाणे. (झाडी) [क. कुच्]

कचकचाट

पु.

१. अतिशय कचकच; मोठा व संयुक्त आवाज; हलकल्लोळ (पिंगळ्याचे ओरडणे, भांडणातील आरडाओरड, तरवारीचा खणखणाट वगैरे). २. भांडाभांडी; तंटाबखेडा. [ध्व.]

कचकचीत

वि.

१. टणक; अपक्व (भात); कच्चा, हिरवा. २. बद्द वाजणारे; फुटक्या आवाजाचे (मडके इ.). ३. मोठा आणि ठळक; स्पष्ट दिसणारा (दागिना, अलंकार). ४. जिच्यात कचकच लागते अशी; रेवाळ (भाकरी वगैरे); रेताड; भरड. ५. पुष्कळ; विपुल.

कचकचीत

क्रिवि.

१. रोख वाजवून; खणखणा (दिलेला दाम, पैका). २. पुरेपूर; सपाटून (मौज करणे, उपभोग घेणे). केवळ जोर दर्शविण्याकरिता हा शब्द योजतात.

कचकचून

क्रिवि.

करकचून; अतिशय जोराने : ‘वातावरणानं त्याला कचकचून दाबून धरलं होतं.’ – बाविबु १४४.

कचकट

स्त्री.

पटकन मोडता येण्याजोगा, ठिसूळ असा बोरू, काठी, वासा तरवार इ.

कचकट

वि.

१. भिकार, मोडका; टाकाऊ. २.कच असलेले (धान्य, पदार्थ); रेव असलेली (भाकरी, पोळी, उसळ इ.)

कचकडा

पु.

१. कासवाची पाठ, हाड; कासवाचा खवला. २. गव्याचे शिंग वगैरे. त्यापासून फण्या वगैरे करतात. ३. कापूर व एक प्रकारची प्रक्रिया केलेला कापूस यांच्या मिश्रणाने बनलेला आणि कंगवे, बिलिअर्डचे चेंडू इ. बनविण्यासाठी वापरण्यात येणारा एक ज्वालाग्राही पदार्थ. [सं. कच्छ +

कचकड्याचा

वि.

(ल.) ज्यात फारसे सामर्थ्य नाही असा; दिखाऊ; सहज मोडला जाणारा.

कचकणे

अक्रि.

१. कच खाणे; मागे परतणे; माघार घेणे (भीतीने); किंचित हार खाणे. २. मारामुळे दबणे; एका बाजूला निसटणे; ठिकाणापासून किंचित बाजूला होणे. ३. ताण पडून किंचित मोडणे (हाड, काठी, तुळई इ.) : ‘गाडीचं जू कचकलं तर कुणाच्या दारी जाशील.’ – व्यंमाक १०४. ४. निराशा होणे; शरण

कचकणे

उक्रि.

जोराने ओढणे; हिसका देणे; धक्का मारणे. ५. आश्चर्यचकित होणे. [ध्व.]

कचकन

क्रिवि.

काच, मडके इ. फुटताना होणाऱ्या आवाजाचा अनुनादक; ताडकन; खाड्‌दिशी; जोराने, एकदम (पोटात शस्त्र खुपसणे, हाताखाली खडा सापडणे). (क्रि. फुटणे) [ध्व.] [क. कचु, कच्चणे]

कचकर

क्रिवि.

काच, मडके इ. फुटताना होणाऱ्या आवाजाचा अनुनादक; ताडकन; खाड्‌दिशी; जोराने, एकदम (पोटात शस्त्र खुपसणे, हाताखाली खडा सापडणे). (क्रि. फुटणे) [ध्व.] [क. कचु, कच्चणे]