शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

क्रिवि.

चटकन; हां हां म्हणता; निमिषमात्रात; एका पळात; चुटकीसरशी. [ध्व.]

चंफा

पु.

चमचा. (व. खा)

चगदळी

पहा : चकदळ, चकदळी

चगदळे

पहा : चकदळ, चकदळी

चटकचांदनी

स्त्री.

१. सुंदर, नखरेबाज स्त्री; चित्ताकर्षक, मोहक, नखरेल तरुणी; माषुक स्त्री : ‘ही रात्र अशी चटकचांदणी खाशी । घ्या बहार उठा किति घालु हात हनवटीशी ।’ - प्रला. २. (सागा.) अति सुंदर तरुणी; खुबसुरत : ‘दोघीही रूपानें चटकचांदण्या असतील, पण एकीस माणीकमोत्यांनीं आपणांस

चपका

पहा : चपखल

चपताड

वि.

चपटा; थपकट; पातळ आणि सपाट. पहा : चपटा

चपताडा

वि.

चपटा; थपकट; पातळ आणि सपाट. पहा : चपटा

चपताळ

वि.

चपटा; थपकट; पातळ आणि सपाट. पहा : चपटा

चबराक

स्त्री.

थप्पड; तडाखा. पहा : चपराक

चमकाविणे

उक्रि.

१.सडकून फटके मारणे, छड्या मारणे; डोळ्यांपुढे काजवे चमकतील असे करणे; मारणे; रागे भरणे. ‘सासूबार्इंनी चमकावले पाहिजे.’ - अहिल्या ६७. [क. चमकायिसु] [सं.] २.शोभविणे; लकाकविणे; चकाकित करणे.३. (डोळे, नथ इ.ची चमक दिसेल अशाप्रकारे) शृंगारचेष्टा करणे.

चरख

क्रिवि.

थक्क; गुंग; कुंठित; स्तंभित; चकित. (क्रि. होणे.)

चव्हेचाळीस

वि.

चाळीस अधिक चार; ४४ ही संख्या. [सं. चतुचत्वारिंशत]

चाटूक्ती

वि.

लाडिक, गोड (भाषण), लाडीगोडीने (बोलणे) : ‘यांनी आपल्या चाटुक्तिपूर्ण भाषेत म्हटले आहे.’ –भस्मृग्रं १६.

चाडू

स्त्री.

किंमत; पर्वा; जरुरी. पहा : चाड : ‘लेह परीसाचा चाडू : देवा रे’ –स्तोत्रमाला १३४.

चामफोड

स्त्री. न. पु.

शरीराच्या बाह्यत्वचेवर असलेला फोडासारखा मोड. त्यास वेदना नसतात : ‘वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडे मसें ।’ – दास ३·६·५०. [सं. चर्मकील]

चामवा

पु.

स्त्री. (गुरांच्या) शरीरावर, अंगावर वाढणारी ऊ, गोचीड : ‘गोचीड अशुद्ध सेविती । चामवा मांसांत घुसती ।’ – दास १·१०·५४. [सं. चर्म]

चिंचुडी

स्त्री.

वांग्याच्या जातीची एक वनस्पती.

चिंचोटी

स्त्री.

वांग्याच्या जातीची एक वनस्पती.

चिंचोडी

स्त्री.

वांग्याच्या जातीची एक वनस्पती.