शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

ठुली

स्त्री.

भरड दळलेले गहू; सांजा; सोजी. [हिं.]

डाळकण

पु. स्त्री.

डाळीचे कण, चूर.

ढवळा

पु.

गाण्याचा प्रकार; लग्नामध्ये म्हणण्याची ओवी. [सं. धवल]

तंग

पु.

घोड्याचे खोगीर आवळण्याचा चामड्याचा पट्टा; घट्ट आवळलेला पट्टा. [फा. तंग्]

तंग

वि.

१. घट्ट; आवळ; आवळ होणारा (अंगरखा, चोळी इ.). २. दृढ : ‘बरवा अंगीं राहे भाव । तंग तोचि जाणा देव ।’ – तुगा ३४५४. ३. घट्ट बांधण्याचा (पट्टा). ४. अडचणीत, पेचात, संकटात सापडलेला (मनुष्य). (वा.) तंग करणे –(एखाद्याला) पेचात धरणे : ‘प्रथमतां झुंजीं त्यास तङ्‌ग केल

तंगचाई

स्त्री.

१. टंचाई; दुर्मिळता; अडचण; तंगी; तुटवडा : ‘परंतु खर्चाची बहुत तङ्‌गचाई जाली.’ – इमं १३४. २. विपन्नावस्था; ओढगस्ती. [फा. तंग+चाय]

तंगचावी

स्त्री.

१. टंचाई; दुर्मिळता; अडचण; तंगी; तुटवडा : ‘परंतु खर्चाची बहुत तङ्‌गचाई जाली.’ – इमं १३४. २. विपन्नावस्था; ओढगस्ती. [फा. तंग+चाय]

तंगटणे

उक्रि.

पायपीट करणे, करायला लावणे. पहा : तांगडणे

तंगड

स्त्री.

लाठीचा पायावर केलेला मार. - लाखे.

तंगड

न.स्त्री.

(निंदार्थी) पाय. पहा : टांगडी. [सं. त्रक्–ख्–ग्] (वा.) तंगडी तोडणे, तंगडी मोडणे –खोड जिरवणे, खोड मोडणे; मर्मावर बोट ठेवणे. तंगड्या उपटनं –राग व्यक्त करणे; असंमतिदर्शक वागणे. (अहि.) तंगड्या गळ्यात टाकणे, तंगड्या गळ्यात पडणे, तंगड्या गळ्यात येणे–कारस्थान स्

तंगडणे

उक्रि.

पायपीट करणे, करायला लावणे. पहा : तांगडणे

तंगडी

न.स्त्री.

(निंदार्थी) पाय. पहा : टांगडी. [सं. त्रक्–ख्–ग्] (वा.) तंगडी तोडणे, तंगडी मोडणे –खोड जिरवणे, खोड मोडणे; मर्मावर बोट ठेवणे. तंगड्या उपटनं –राग व्यक्त करणे; असंमतिदर्शक वागणे. (अहि.) तंगड्या गळ्यात टाकणे, तंगड्या गळ्यात पडणे, तंगड्या गळ्यात येणे–कारस्थान स्

तंगणे

अक्रि.

१. क्षीण होणे; रोडावणे. २. विपन्नावस्थेला, अवनतीला येणे; दरिद्री होणे. ३. थकणे; दमणे. ४. कष्ट करणे.

तंगतंगीत

वि.

१. फार घट्ट बांधलेला, आवळलेला. २. अंगाबरोबर; आटपशीर; सुटसुटीत; घटमूठ. ३. (सामा.) तंग : ‘उरीं दोन्ही गेंद गुलाबी संगीत । वर कंचुकी ल्याली तंगतंगीत ।’ – पला ४·४४. [फा. तंग]

तंगतुरसी

स्त्री.

अडचण : ‘आपल्या अवकात चालत नाही. बहुत जबुन वक्त तंगतुरासी जाहली आहे.’ – शिचसाखं २. पृ. २१९.

तंगतोड

वि.

नग्नदीक्षा घेण्याच्या बेतात असल्यामुळे वस्त्राचे बंद तोडून टाकलेला (गोसावी इ.).

तंगतोबरा

पु. स्त्री.

घोड्याला लागणाऱ्या जिन, तंग, तोंबरा इ. जिनसा : ‘घोड्याला तंगतोबरी जिनबंद कोरी ।’ – ऐपो ४२९. [फा.]

तंगतोबरी

पु. स्त्री.

घोड्याला लागणाऱ्या जिन, तंग, तोंबरा इ. जिनसा : ‘घोड्याला तंगतोबरी जिनबंद कोरी ।’ – ऐपो ४२९. [फा.]

तंगदार

पहा : तंग वि. १

तंगपिलपिले

न.

फळ्यांना सांध्याची खोबण पाडण्याचे सुतारी हत्यार. (को.) [इं.टंग + म. पिलपील]