शब्द समानार्थी व्याख्या
तइ क्रिवि. १. तेव्हा; त्या वेळी : ‘वचन आपुलें सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज कळसी ।’ – तुगा ७३६. २. तेथे; तिकडे. [संतदा]
  मराठी वर्णमालेतील एकतिसावा वर्ण व सोळावे व्यंजन. 
तई क्रिवि. १. तेव्हा; त्या वेळी : ‘वचन आपुलें सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज कळसी ।’ – तुगा ७३६. २. तेथे; तिकडे. [सं. तदा]. ३. रवाना; पाठवलेला : ‘वझीर आजम व खानदौरा व बंगस वगैरे अमीर तई केले.’ – पेद १५·१७.
तइ अ. खाली; पाठी. (वा.) तइ ढकलनं, तयी ढकलनं – काणाडोळा करणे; दोषांकडे दुर्लक्ष करणे; लपवणे. (अहि.)
तयी अ. खाली; पाठी. (वा.) तइ ढकलनं, तयी ढकलनं – काणाडोळा करणे; दोषांकडे दुर्लक्ष करणे; लपवणे. (अहि.)
तई स्त्री. १. अन्न शिजविण्यास उपयोगी असे धातूचे किंवा मातीचे भांडे; तवी; तवली. – बदलापूर ६५. २. चपटा दगड. (अहि.) ३. जात्याची तळी. (अहि.) (वा.) तई उखलनं – काढून टाकणे; वगळणे.
तईनी जमीन   नांगरताना तळ्यासारखी ढेकळे निघतात अशी टणक जमीन. (अहि.)
तऊर पु. १. तोरा; आढ्यता; दिमाख; ऐट; अभिमान; गर्व. २. तल्लखपणा; लगेच राग येण्याचा स्वभाव; शीघ्रकोपित्व. ३. दिलदारपणा. ४. हिंमत; धिटाई; हिय्या. (फा.)
तक पु. १. तवा. उदा. ‘कर्मतक’ –रावाको, २. नवस. ३. कुवत. (झाडी)
तक स्त्री. संधी; वेळ; प्रसंग : ‘हे तक फार उत्तम आहे यैसी येणार नाही.’ – पेद ३६·८१. [हिं.]
तकई   पहा : तकवाई
तगई   पहा : तकवाई
तकट न. १. दागिने करण्यासाठी ठोकून पातळ केलेला सोने इ. धातूचा पत्रा; तबक; वर्ख. २. लहान मुलामुलींच्या करगोट्यात पुढे घालावयाचे पिंपळपान; एक दागिना. (राजा.) [फा.]
तकट वि., क्रिवि. १. क्रियेतील आवेश, जोर, जलदी, चपळाई, भरगच्चपणा इ.चा निदर्शक असा क्रियापदासोबत योजावयाचा शब्द. पहा : तडक>. २. आवळून; गच्च; खच्चून; एकदम : ‘पाठीवर घाव घेऊन तकट पळालेला इंग्रजी सोजीरही आमच्या बाजीरावापेक्षा... अधिक शूर असे ज्यास भासत नाही...’  – नि २०७.
तकटून वि., क्रिवि. १. क्रियेतील आवेश, जोर, जलदी, चपळाई, भरगच्चपणा इ.चा निदर्शक असा क्रियापदासोबत योजावयाचा शब्द. पहा : तडक. २. आवळून; गच्च; खच्चून; एकदम : ‘पाठीवर घाव घेऊन तकट पळालेला इंग्रजी सोजीरही आमच्या बाजीरावापेक्षा... अधिक शूर असे ज्यास भासत नाही...’ – नि २०७.
तकटणे उक्रि. १. आवळणे; घट्ट, तकटून बांधणे. २. सपाटून खाणे; पोटात खच्चून भरणे; तकटून जेवणे. [सं.टक्‌]
तकटबंद पु. स्त्री. १. कुंपण वगैरे घालून वेढलेली स्थिती; परिवेष्टण; आवरण. २. वेढा; कोंडमारा. ३. (ल.) तगादा, निकड लावणे; बोकांडी बसणे. ४. सामानसुमान इ. घट्ट आवळून बांधणे. ५. (ल.) अटकाव, प्रतिबंध करणे; कोंडणे; कोंडमारा करणे.
तगटबंद पु. स्त्री. १. कुंपण वगैरे घालून वेढलेली स्थिती; परिवेष्टण; आवरण. २. वेढा; कोंडमारा. ३. (ल.) तगादा, निकड लावणे; बोकांडी बसणे. ४. सामानसुमान इ. घट्ट आवळून बांधणे. ५. (ल.) अटकाव, प्रतिबंध करणे; कोंडणे; कोंडमारा करणे.
तकडबंद पु. स्त्री. १. कुंपण वगैरे घालून वेढलेली स्थिती; परिवेष्टण; आवरण. २. वेढा; कोंडमारा. ३. (ल.) तगादा, निकड लावणे; बोकांडी बसणे. ४. सामानसुमान इ. घट्ट आवळून बांधणे. ५. (ल.) अटकाव, प्रतिबंध करणे; कोंडणे; कोंडमारा करणे.
तगडबंद पु. स्त्री. १. कुंपण वगैरे घालून वेढलेली स्थिती; परिवेष्टण; आवरण. २. वेढा; कोंडमारा. ३. (ल.) तगादा, निकड लावणे; बोकांडी बसणे. ४. सामानसुमान इ. घट्ट आवळून बांधणे. ५. (ल.) अटकाव, प्रतिबंध करणे; कोंडणे; कोंडमारा करणे.