शब्द समानार्थी व्याख्या
तिकटणे न. १. शेतामध्ये तीन बांध एकत्र येतात ते ठिकाण. २. तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण. ३. तीन काठ्या वगैरे एकत्र बांधून केलेली रचना.
तिकटी स्त्री. १. पहा : तिकटणे २, ३. २. त्रिकोण. ३. तिरडी.
तिकटे न. १. लाकडी त्रिकोण; तिकटी. (स्मशानात अग्नी नेण्यासाठी, विहिरीतून पदार्थ वर काढण्यासाठी वगैरे केलेला तीन कामट्या, लाकडे यांचा). २. (पळस, बेल, निर्गुडी इ. चे) त्रिदळ. ३. तीन पानांची पत्रावळ. ४. तिफण; तीन नळकांड्यांची पाभर. ५. लाकडाची तिवई; तीन काठ्यांची घडवंची.
तिकटे वि. अस्थिर; टिकाऊ नसलेले. (गो.)
तिकडना क्रि. वेदना होणे. (झाडी)
तिकडे क्रिवि. १. त्या बाजूला, दिशेला; त्या जागेकडे. २. त्या ठिकाणी; तेथे. ३. (बायकी) बायको पूर्वी नवऱ्याचे नाव घेत नसे, म्हणून नवऱ्याचा निर्देश करताना हा शब्द विभक्तीसह वापरला जात असे : ‘अशा गडबडीच्या वेळी तिकडची भेटसुद्धा व्हावयाची नाहीं…’ – सुसु ११.
तिक धरनं   ताठर वागणे; खूणगाठ बांधून वागणे; सत्याची चाड बाळगणे. (अहि.)
तिकळा वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिकळी वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिकळे वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिखळा वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिखळी वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिखळे वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिखुळा वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिखुळी वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिखुळे वि. तीन मुलगे अथवा मुलांच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामान्यतः मूल).
तिकाकरी स्त्री. तिफण; गहू पेरण्याचे साधन. (व.)
तिकाडी स्त्री. १. मासे पकडण्याचे तीनदारी जाळे. २. एक हलक्या जातीचें गवत. – चित्रकृषि २·६.
तिकांडे न. मृगशीर्ष नक्षत्रपुंजातील तीन तारे; शिवाचा बाण. पहा : लुब्धक [सं. त्रिकांड]
तिकांड्या न. मृगशीर्ष नक्षत्रपुंजातील तीन तारे; शिवाचा बाण. पहा : लुब्धक [सं. त्रिकांड]