शब्द समानार्थी व्याख्या
त्रय न. तीन वस्तू, एक विचारांच्या तीन व्यक्ती इ.चा समुदाय; त्रिकूट; त्रिवर्ग. [सं.]
त्रयस्थ वि. तिऱ्हाईत; दोघांपैकी कोणत्याही पक्षाला न मिळालेला; तटस्थ; परका. [सं.]
त्रयी स्त्री. १. (व्यापक) तिघांचा समुदाय. २. बाप, आजा, पणजा असे अनुक्रमाने येणारे तीन पूर्वज. ३. आई, आजी व पणजी या तिन्ही समुच्चयाने. ४. ऋक्, यजुस् व साम हे तीन वेद. ५. राजनीतीतील एक प्रकार; धर्मविद्या. [सं.] (वा.) (एखाद्याची) त्रयी उद्धरणे – >एखाद्याला आईबापावरून शिव्या देणे; पितर उद्धरणे. त्रयीमध्ये उगवलेला – १. तिन्ही वेदांत पारंगत असणारा. २. (उप.) चोरी, चहाडी व शिनळकी या तीन गोष्टींत कुशल असलेला.
त्रयोदश वि. १. तेरा. २. तेरावा. [सं.]
त्रयोदशी स्त्री. चांद्रमासाच्या, मराठी महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील तेरावी तिथी. [सं.]
त्रसणे अक्रि. संत्रस्त होणे; त्रासणे; कंटाळणे : ‘एकाधा एकु त्रसला जाए’ – लीचउ २२. [सं. त्रस्]
त्रसरेणु पु. उन्हाच्या कवडशात दिसणारा अतिसूक्ष्म रजःकण. तीन द्व्यणुके मिळून हा तयार होतो. हे वजनाचे सूक्ष्म परिमाण मानले आहे. [सं.]
त्रस्त वि. १. त्रासलेला; गांजलेला; उद्विग्न; जिकिरीला आलेला. २. भ्यालेला; घाबरलेला. [सं.]
त्रस्तदृष्टी स्त्री. (नृत्य). वरच्या पापण्या वर व खालच्या खाली ठेवून बुबुळे सारखी फिरवण्याचा अभिनय. [सं.]
त्रहाटणे उक्रि. १. मारणे; नायनाट करणे : ‘अहंकारातें त्रहाटी ।’ – ज्ञाप्र १३८. २. (वाद्ये) मोठ्याने वाजणे, वाजवणे. ३. सैन्य इ. सिद्ध करणे. – मनको. ४. आपटणे; थापटणे : ‘आवेशे भुजा त्राहाटिती ।’ – ज्ञा १·१३३. ५. चढवणे; पसरणे : ‘रामपूजेची सामग्री । छेत्रें त्राहाटसीं तयावरी ।’ – वेसीस्व ८·११९. [सं.तड्]
त्राहाटणे उक्रि. १. मारणे; नायनाट करणे : ‘अहंकारातें त्रहाटी ।’ – ज्ञाप्र १३८. २. (वाद्ये) मोठ्याने वाजणे, वाजवणे. ३. सैन्य इ. सिद्ध करणे. – मनको. ४. आपटणे; थापटणे : ‘आवेशे भुजा त्राहाटिती ।’ – ज्ञा १·१३३. ५. चढवणे; पसरणे : ‘रामपूजेची सामग्री । छेत्रें त्राहाटसीं तयावरी ।’ – वेसीस्व ८·११९. [सं.तड्]
त्राहटणे उक्रि. १. मारणे; नायनाट करणे : ‘अहंकारातें त्रहाटी ।’ – ज्ञाप्र १३८. २. (वाद्ये) मोठ्याने वाजणे, वाजवणे. ३. सैन्य इ. सिद्ध करणे. – मनको. ४. आपटणे; थापटणे : ‘आवेशे भुजा त्राहाटिती ।’ – ज्ञा १·१३३. ५. चढवणे; पसरणे : ‘रामपूजेची सामग्री । छेत्रें त्राहाटसीं तयावरी ।’ – वेसीस्व ८·११९. [सं.तड्]
त्रागा पु. दुसऱ्याचे नुकसान व्हावे म्हणून किंवा दुसऱ्यावर ठपका यावा म्हणून संतापाच्या भरात स्वतःलाच दुखापत करून घेणे किंवा स्वतःची हानी करून घेण्यास तयार होणे; डोक्यात राख घालणे. (क्रि. करणे). [गु. त्रागुं]
त्राटक न. डोळे ताठ उघडून एकाच पदार्थाकडे, डोळ्यांना पाणी येईपर्यंत नासाग्राकडे, इष्ट ध्येयाकडे दृष्टी लावण्याची योगशास्त्रातील क्रिया. – संयोग ३५५. [सं.]
त्राटिका स्त्री. १. एक राक्षसी. २. (ल.) कजाग स्त्री. [सं.]
त्राण न. १. रक्षण; सांभाळ. २. रक्षण करण्याचे साधन; आधार : ‘...आयुष्याचें त्राण । नीच नवें हें । – ज्ञा १७·१३१. ३. नरकापासून तारण; मुक्ती; मोक्ष. ४. अतिशय जोराचा, नेटाचा, सर्व शक्ती एकवटून केलेला प्रयत्न : ‘एक शर सोडोनियां त्राणें कर्णनंदन उडविला ।’ – जै १८·७९. ५. संतापाने, त्वेषाने केलेली आदळआपट, आरडाओरड इ.; हातपाय झाडणे व चडफडणे. ६. (जीर्ण वस्त्र, वस्तू, दुबळा मनुष्य, जनावर इ.त) शिल्लक राहिलेला दम, जीव, जोर, धडधाकटपणा, सत्त्व, ताकद, सार. [सं.त्रा]
त्राण पु. बत्ता; खलातील घोट्या : ‘गारा फोडुनु घालीजे त्रांणें ।’ – वैद्यक ४. [सं.]