शब्द समानार्थी व्याख्या
दिअ पु. दिवस : ‘बहुवां दिआंची भूक ।’ -ज्ञा ६·२२८. [सं. दिवस]
दिउ पु. दिवस : ‘बहुवां दिआंची भूक ।’ -ज्ञा ६·२२८. [सं. दिवस]
दिऊ पु. दिवस : ‘बहुवां दिआंची भूक ।’ -ज्ञा ६·२२८. [सं. दिवस]
दिय पु. दिवस : ‘बहुवां दिआंची भूक ।’ -ज्ञा ६·२२८. [सं. दिवस]
दिक स्त्री. १. काळजी; पर्वा; भीड : ‘येथें दिक् कोठें आहे! राज्य बुडतें ही काळजी कोठें आहे.’ -ऐलेसं १०·५३४३. २. अडथळा : ‘शिंदे बहुत वाढले आहेत, कांही दिक्क राहिली नाहीं...’ - ऐलेसं १०·५३४४.
दिक वि. १. क्षीण; बेजार; दमलेला; आजारी : ‘हगवणीनें दिक्क झाले आहेत.’ - ऐलेसं १०·५२७३. २. त्रस्त; विटलेला : ‘अंतर्यामीं नबाब बहुत दिक्क व विचारांत.’ - मइसा ५·१६२. ३. खप्पा; नाखूष : ‘वयनींची मर्जी खर्चाची वोढ पडल्यामुळें दिक्क आहे.’ - ऐलेसं ११·६००९. ४. थक्क; चकित. [अर. दिक्क]
दिक्क स्त्री. १. काळजी; पर्वा; भीड : ‘येथें दिक् कोठें आहे! राज्य बुडतें ही काळजी कोठें आहे.’ -ऐलेसं १०·५३४३. २. अडथळा : ‘शिंदे बहुत वाढले आहेत, कांही दिक्क राहिली नाहीं...’ - ऐलेसं १०·५३४४.
दिक्क वि. १. क्षीण; बेजार; दमलेला; आजारी : ‘हगवणीनें दिक्क झाले आहेत.’ - ऐलेसं १०·५२७३. २. त्रस्त; विटलेला : ‘अंतर्यामीं नबाब बहुत दिक्क व विचारांत.’ - मइसा ५·१६२. ३. खप्पा; नाखूष : ‘वयनींची मर्जी खर्चाची वोढ पडल्यामुळें दिक्क आहे.’ - ऐलेसं ११·६००९. ४. थक्क; चकित. [अर. दिक्क]
दिकत स्त्री. १. सूक्ष्म दोष; शंका; हरकत; आक्षेप; कबूल करण्यात कांकूं : ‘इंग्रज दोनी दौलतींत (निजामाच्या व पेशव्यांच्या) पाय घालतात यांत दिक्कत नाहीं ।’ - ऐलेसं १२·६८३४. २. तंगी; टंचाई : ‘पाण्याचे दिकतीनें आणि उष्णकाळ भारी म्हणून आठशें माणसें मरण पावलीं.’ - दिमरा २·८७. [अर. दिक्कत]
दिक्कत स्त्री. १. सूक्ष्म दोष; शंका; हरकत; आक्षेप; कबूल करण्यात कांकूं : ‘इंग्रज दोनी दौलतींत (निजामाच्या व पेशव्यांच्या) पाय घालतात यांत दिक्कत नाहीं ।’ - ऐलेसं १२·६८३४. २. तंगी; टंचाई : ‘पाण्याचे दिकतीनें आणि उष्णकाळ भारी म्हणून आठशें माणसें मरण पावलीं.’ - दिमरा २·८७. [अर. दिक्कत]
दिक् स्त्री. १. दिशा. २. मर्यादा. (समासात) दिक्पाल; दिक्साधन. [सं.]
दिग्‌ स्त्री. १. दिशा. २. मर्यादा. (समासात) दिक्पाल; दिक्साधन. [सं.]
दिक्कत   (ना.) पहा : दिक , दिक्क वि. १
दिक्कतखोर वि. १. आढेवेढे घेणारा; हेकेखोर; फाटे फोडणारा; संशयी; शंकेखोर; अडचणी काढणारा (मनुष्य). २. नाकारले जाण्याजोगे (नाणे). पहा : दिक्कत २
दिक्कती वि. १. आढेवेढे घेणारा; हेकेखोर; फाटे फोडणारा; संशयी; शंकेखोर; अडचणी काढणारा (मनुष्य). २. नाकारले जाण्याजोगे (नाणे). पहा : दिक्कत २
दिक्चालन न. जहाज, विमान यांचा मार्ग होकायंत्राच्या साहाय्याने ठरवणे.
दिक्पट वि. सैरभैर : ‘भेणे जाले दिक्‌पट’ - ज्ञागा १८९.
दिक्परिवर्तक पु. विजेचा प्रवाह उलट करण्याचे उपकरण.