शब्द समानार्थी व्याख्या
  १. मराठी वर्णमालेतील एकोणिसावे व्यंजन व चौतिसावे अक्षर. २. (सांकेतिक) धरणे. (वा.) ध चा मा करणे – (सांकेतिक) (आनंदीबार्इ पेशवे हिने राघोबादादा याच्या हुकमातील ‘धरावे’ या शब्दात ‘ध’ चा ‘मा’ करून ‘मारावे’ असा फरक केला होता अशी समजूत आहे त्यावरून) मूळच्या लेखात नवीन व स्वतःला फायदेशीर असा महत्त्वाचा मजकूर लबाडीने घुसडवणे; स्वार्थ साधण्यासाठी बदल करणे.
पु. धैवत हा गायनातील सहावा स्वर.
धक स्त्री . पु. १. जोम; उत्साह. २. (विस्तवाची) आच; शेक; झळ; ताप. ३. पेटलेला विस्तव; अग्नी; जाळ. ४. (गर्व, प्रौढी, भावना इ. ची) गुर्मी; जहालपणा; तीव्रता. ५. संताप; जळफळ. (गो.) ६. अंगातील बारीक ताप; कडकी. (कु.) [सं. दह्; बं. गु. धक; क. ढगे]
धग स्त्री . पु. १. जोम; उत्साह. २. (विस्तवाची) आच; शेक; झळ; ताप. ३. पेटलेला विस्तव; अग्नी; जाळ. ४. (गर्व, प्रौढी, भावना इ. ची) गुर्मी; जहालपणा; तीव्रता. ५. संताप; जळफळ. (गो.) ६. अंगातील बारीक ताप; कडकी. (कु.) [सं. दह्; बं. गु. धक; क. ढगे]
धक वि. योग्य; लायक; सिद्ध : ‘हे काम करावयास धक आहेत.’ – पेद ९·३.
धकणे अक्रि. १. निर्वाह, निभाव होणे; निभावून जाणे. २. (अन्न, जेवण) घशाखाली उतरणे; पोटात जाणे; खपणे : ‘तिखटावेगळ भाकर न धके ।’ – विक ७९. ३. (आगगाडी, वाहन इ.) चालू होणे, धक्क्याने हालणे; ढकलले, लोटले जाणे : ‘जितके हरिभजनाला चुकाल । तितके यमाजीकडे धकाल ।’ – अफला ६२. [सं. दक्ष]
धकधक न. स्त्री . १. धडकी; धागधुग; भीती. २. धडधड. ३. दगदग; खटाटोप. [ध्व. धक् द्वि. : हिं. धकधकी; सं. धृप्]
धकाधक न. स्त्री . १. धडकी; धागधुग; भीती. २. धडधड. ३. दगदग; खटाटोप. [ध्व. धक् द्वि. : हिं. धकधकी; सं. धृप्]
धकधक क्रिवि. धागधुग; माटमुट; जीव वरखाली होणे.
धकधक उद्गा. (सांकेतिक) हत्तीने जोराने चालावे म्हणून माहूत वापरतात तो शब्द. [ध्व. धक् द्वि.]
धकधका क्रिवि. धागधुग; माटमुट; जीव वरखाली होणे.
धकधका उद्गा. (सांकेतिक) हत्तीने जोराने चालावे म्हणून माहूत वापरतात तो शब्द. [ध्व. धक् द्वि.]
धकधकणे अक्रि. ऊर खालीवर होणे, उडणे; धडधड करणे.
धकाधका स्त्री . (परस्परांत होणारी) धक्काबुक्की; रेटारेटी; झोंबाझोंबी; झोंटधरणी. [धका द्वि.]
धकाधकी स्त्री . (परस्परांत होणारी) धक्काबुक्की; रेटारेटी; झोंबाझोंबी; झोंटधरणी. [धका द्वि.]
धकाधका क्रिवि. ऊर जोराने धडधडत असताना. [ध्व. धक द्वि.]
धकाधक क्रिवि. ऊर जोराने धडधडत असताना. [ध्व. धक द्वि.]
धकावणे अक्रि. १. (ल.) (सामा.) नासणे; बिघडणे; खराब होणे; नुकसानीत, आतबट्ट्यात येणे; बसणे; खालावणे. २. (प्रवाहाच्या सपाट्यात सापडून) वाहणे; जाणे. ३. कचणे; कचरणे; खचणे; गळणे.
धकावणे उक्रि. १. पुढे रेटणे, लोटणे; ढकलणे : ‘घोडे पुढें धकावूनी नाना – । सहवर्तमान पुण्यात आले राऊत ।’ – ऐपो २५३. २. हिसडा, आचका, हबका बसणे, देणे; हिसडणे.