शब्द समानार्थी व्याख्या
धू स्त्री. १. धूर : ‘हें असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधी ।’ - ज्ञा १८·७८०. [सं. धूम; हिं. धुंआ], २. मुलगी. (कु.) [सं. दुहितृ]
धूइजणे   पहा : धुणे : ‘सुधाकराचा खांदवखालीं । धूइजेती कापुराची सुआंळीं ।’ - शिव ६३३.
धूज स्त्री. १. महत्त्वाकांक्षा; ईर्षा. २. आरोप; कर्तव्य.
धूजड वि. बैलगाडीत पुढच्या बाजूला ओझे फार झाल्यामुळे बैलांच्या मानेवर जिचा भार आहे अशी गाडी. (ना.) [सं. धूर् + जू]
धूड न. १. अवाढव्य, अज माणूस. २. प्रचंड साप, जनावर इ. : ‘असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुख एक चावितो धुडें ।’ - तुगा ४७८. ३. मोठे झाड (विशेषतः पाडलेले); लाकडाचा मोठा ओंडा, खडक इ. ४. शेतातील मूळखंड. - भात्रै ७·१ ते ४. (खा.) [क. दोड्ड]
धूण न. १. तांदूळ धुतलेले पाणी; धुवण. २. डाळ इ. चे पाणी; पाणचट आमटी, वरण. [सं. धू]
धूत वि. १. धुतलेले. २. स्वच्छ, साफ केलेले : ‘अति अढळ सत्यधूत वाणी ।’ - एभा ३·५२७. ३. भीतीने हलणारे; कापणारे. [सं.]
धूत उद्गा. छत्; हुडत्; धिक्कारदर्शक उद्गार. (ना.) [ध्व.]
धूतवस्त्र न. सामान्य सोवळ्याच्या उपयोगी, धुऊन वाळवलेले वस्त्र.
धूत्कार पु. फूत्कार (सापाचा). (क्रि. टाकणे, देणे, करणे.). [ध्व.;सं.]
धूधू पु. धुधुकार; जागे करण्यासाठी योजण्याचा ध्वनी : ‘म्हणऊनी धू धू करी घेउनी । जागें करी जननी त्या गरुड ध्वजाला ।’ - आकृ १३. [ध्व.]
धून स्त्री. १. लांबलेला घुमणारा ध्वनी; गुणगुण; झणकार (वाद्यतंतूचा किंवा लांबच्या संगीताचा). २. ध्वनिमिश्रण; ध्वनीची छटा, झाक. ३. लोकांत गुणगुण, कुणकुण. (क्रि. उठणे, निघणे). [सं. ध्वनि], ४. (विणकाम) कापड गुंडाळण्याचे चौकोनी लाकूड.
धूप स्त्री. १. पावसाने माती वाहून जाणे. २. (शरीर इ. ची) झीज. ३. सूर्यप्रकाश; ऊन. [सं. धूप्; हिं.] (वा.) धूप घालणे - १. (झपाटलेल्या माणसाच्या अंगातील) भुताने बोलावे म्हणून त्याच्यापुढे ऊद जाळणे. २. मोठ्या नम्रतेने, अजीजीने आर्जव, विनंती, प्रार्थना करणे. ३. (अकरणरूपी प्रयोगासारखा) न जुमानणे; मर्जीप्रमाणे न वागणे. धूप दाखविणे -  चाळवणे; झुलवणे; काही न देणे.
धूप पु. १. धूर निघणारा ऊद इ. सुगंधी पदार्थ. २. सुगंधी द्रव्यांचा धूर. ३. (सामा.) उदबत्ती.
धूपकाडी स्त्री. धूप चोपडलेली काडी; उदबत्ती.
धूपघाल्या वि. एकसारख्या कलागती लावून भांडण चालू ठेवणारा; कळलाव्या.
धूपसाळी स्त्री. एक झाड. ह्यापासून लोबान काढतात.
धूपायन न. धुपाटणे.
धूपावणे न. धुपाटणे.