शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील विसावे व्यंजन व पस्तिसावे अक्षर.
पु. नकार : ‘त्वद्वदनोत्थ न पडला अर्थिजनाच्या कधींहि कानीं न ।’ – मोउद्योग १०·७४.
अ. १. निषेधार्थी, नकारार्थी शब्द; नाही. २. नको. [सं.] (वा.) न चा, नन्नाचा पाढा वाचणे, सांगणे, घट्ट करणे, घोकणे –नेहमी प्रत्येक गोष्ट, काम नाकारणे.
उअ. १. त्याच त्याच दोन शब्दांमध्ये ते दोन शब्द जोडण्यासाठी योजण्याचा, ने–सह–बरोबर–मागून इ. अर्थाचा शब्द. उदा. पैसा न पैसा, पायरी न पायरी इ. २. आणि, व, अन्. उदा. घोडा न बैल. (बोलताना हा ‘न’ निराळा न उच्चारता जोडीतील पहिल्या शब्दाला जोडून अर्ध्या ‘न्’ सारखा उच्चारला जातो.).
नई स्त्री. नदी : ‘नई हो कां भरतैसी थोरी ।’ – ज्ञा १७·३२४. [सं. नदी]
नईस स्त्री. प्रेत वाहून नेण्याची तिरडी : ‘नईस न्यावयास ब्राह्मण तेलंग केले.’ – मइसा ६·५. [अर. नअश्]
नउ, नऊ ने सुरू होणारे शब्द येथे न सापडल्यास नव, नौ मध्ये पाहावेत.
नऊ वि. ९ ही संख्या. [सं.]
नकटा वि. १. ज्याचे नाक कापलेले आहे असा. २. आखूड, चपट्या, बसक्या नाकाचा. ३. (ल.) काही अंशी अपुरी, दोषयुक्त राहिलेली, व्यंगयुक्त गोष्ट, कार्य इ. [हिं.]
नकटावकटा वि. कुरूप आणि हिडीस, ओंगळ दिसणारा.
नकटे न. अर्ध्या पावशेराचे माप; निपटे; पिटके; १० तोळ्यांचे वजन; नवटाक; नवटके. (खा.)
नकतरी पु. शेतात देवकृत्ये करणारा शूद्र; नक्षत्रावरून ज्योतिष सांगणारा. [सं. नक्षत्र]
नखतरी पु. शेतात देवकृत्ये करणारा शूद्र; नक्षत्रावरून ज्योतिष सांगणारा. [सं. नक्षत्र]
नकदीकरण न. रोख पैशांत बदलून मिळणे.
नकल स्त्री. १. प्रतिलिपी; मूळ प्रतीवरून केलेली हुबेहूब दुसरी प्रत. २. हुबेहूब प्रतिकृती, प्रतिमा. ३. एखाद्याच्या वागण्या–बोलण्याचे वगैरे केलेले हुबेहूब अनुकरण; कित्ता. ४. हास्यकारक, चमत्कृतिजनक, गमतीची गोष्ट इ. ५. पहिली, मूळ प्रत. ६. नाटकात पात्राने बोलण्याचे भाषण; संवाद.
नकल स्त्री. न. समूळ नाश; निर्वंश, नामशेष होणे : ‘कित्येकांचीं घरें बसलीं, कित्येकांच्या नकला जाहल्या.’ – पाब ४९. [अर. नक्ल]
नक्कल स्त्री. १. प्रतिलिपी; मूळ प्रतीवरून केलेली हुबेहूब दुसरी प्रत. २. हुबेहूब प्रतिकृती, प्रतिमा. ३. एखाद्याच्या वागण्या–बोलण्याचे वगैरे केलेले हुबेहूब अनुकरण; कित्ता. ४. हास्यकारक, चमत्कृतिजनक, गमतीची गोष्ट इ. ५. पहिली, मूळ प्रत. ६. नाटकात पात्राने बोलण्याचे भाषण; संवाद.
नक्कल स्त्री. न. समूळ नाश; निर्वंश, नामशेष होणे : ‘कित्येकांचीं घरें बसलीं, कित्येकांच्या नकला जाहल्या.’ – पाब ४९. [अर. नक्ल]
नकलणे सक्रि. १. अनुकरण करणे. २. प्रत करणे, लिहिणे.
नक्कलणे सक्रि. १. अनुकरण करणे. २. प्रत करणे, लिहिणे.