शब्द समानार्थी व्याख्या
नि अ. उप. १. खात्री; निखालसपणा. २. नकार; अभाव. उदा. निकोप, निकामी. ३. अतिशयता. उदा. निमग्न. [सं. निर्]
नि अ. अन्; आणि.
निआव्हणे क्रि. निर्वाह करणे.
निउटके न. एक माप; अर्धे चौटके; शेराचा बत्तिसावा हिस्सा; चिळवे.
निउता वि. क्रिवि. अलीकडे; नुकतेच.
निउन वि. १. हलक्या प्रतीचे : ‘तियाहीउनि आणीक निउन म्हणीये दीधले:’ – लीचपू २०२. २. दुर्बळ : ‘तेयांचे स्थळ निउन होए:’ – लीचपू ७१.
निक क्रिवि. निश्चितपणे : ‘फळप्राप्ति होय निक ।’ – गुच १९·१९.
निकट वि. जवळचा; शेजारचा.
निकट क्रिवि. जवळ; नजीक; लागून; जवळपास; शेजारी. [सं.]
निकट   पहा : निकड
निकटणे अक्रि. १. दूर जाणे, राखणे; बाजूला होणे; (घर, अधिकार, पद इ.पासून) निघून जाणे. (ज्याचे जाणे इष्ट असते अशाबद्दल योजतात.), २. जवळ, नजीक येणे.
निकाटणे अक्रि. दूर जाणे, राखणे; बाजूला होणे; (घर, अधिकार, पद इ.पासून) निघून जाणे. (ज्याचे जाणे इष्ट असते अशाबद्दल योजतात.)
निकटदृष्टिता स्त्री. एक दृष्टिदोष. यात प्रकाशकिरण नेत्रपटलापासून थोडे पुढे केंद्रित होतात.
निकड स्त्री. १. तड; लकडा; तगादा; हव्यास. (क्रि. लावणे). २. तातडी; जरुरी; अडचण. ३. लोट; नेट. ४. हल्ला. [सं. निकट]
निकण न. १. दुसऱ्यांदा मळलेली, तुडवलेली, पोकळ (जोंधळा, बाजरी इ.ची) कणसे. २. दाणा होण्यापूर्वीचा कणसाचा भाग.
निकण वि. १. कणहीन; मळणी झाल्यानंतरचे, धान्य निघून गेलेले, रिकामे (कणीस). २. किड्यांनी खाल्ल्यामुळे सत्त्वरहित, फोल (धान्य). ३. कण्या काढून साफ केलेले; कणी काढलेले; बिनकणीचे (तांदूळ इ.). ४. कांडताना कूट न होणारे (तांदूळ इ.). ५. कणी नसलेले, हलके, भिकार (तूप). [सं. निस्+कण]
निकणे अक्रि. लपणे; लिकणे. (बे.) [क.]
निकता क्रिवि. नुकता; अलीकडे; थोड्या दिवसांपूर्वी.
निकती स्त्री. (सोनारी) सराफाचा वजन करण्याचा सूक्ष्म काटा. [हिं.]
निकर पु. १. कामाचा सोयीचा मार्ग सोडून राग इ. आवेशपूर्ण प्रवृत्ती; हट्ट. २. कहर; गहजब; आकांडतांडव : ‘तुवां निकरची लावण्यखाणीं । केला बहुत आम्हांवरी ।’ – ह २७·१०६. ३. जोर; आवेश. ४. प्रलय; कडेलोट; आत्यंतिक मर्यादेपर्यंतची स्थिती : ‘वदले सुरमुनि करितो नररूपें रुद्र काय हा निकर ।’ – मोभीष्म ३·५८. ५. वाईट परिणाम, शेवट : ‘थट्टेचा निकर होईल.’ – बाळ २·३०. [सं. नि+कृष्], ६. समुदाय; समूह; संग्रह; ढीग. ७. प्राचुर्य; समृद्धी; लयलूट. [सं.]