शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकशाल, अकसाळी

स्त्री.

कर्नाटकी सोनारांची जात.

अकशेरू

वि.

(प्राणि.) पाठीचा कणा नसलेला (प्राणी); पृष्ठवंशहीन (प्राणी). उदा. जेलीफिश, गांडूळ इत्यादी.

अकसात

स्त्री.

वार्षिक वसुलाचे हप्ते.

अकसीर

वि.

गुणकारक; परिणामकारक; रामबाण. [अर.]

अकस्मात

अ.

१. अकल्पित; एकाएकी. २. विचार केल्याशिवाय; आधार नसता; पूर्वसूचना नसता. [सं.]

अकस्मादिक

वि.

अचानक : ‘तेयाचे अकस्मादिक : सुजे नाक.’ रकौ २९१

अकळ

वि.

न समजणारे; अगम्य; दुर्बोध; दुर्ज्ञेय.

अकळणे

अक्रि.

जांभर्इ, उचकी, अखेरचा श्वास येणे–देणे.

अकळत, नकळत

क्रिवि.

१. चुकूनमाकून; न जाणता; अज्ञानाने. २. यदृच्छेने.

अकळवणी

न.

भलत्याच वेळी पडणारा पाऊस.

अकळी

स्त्री.

१. बुडत्याने किंवा मरणाऱ्याने झटका देऊन जोराने टाकलेला श्वास; अखेरचा श्वास; उचकी; आचका. २. जांभर्इ.

अकळून–नकळून

क्रिवि.

अकळत–नकळत.

अकंटक

वि.

१. निष्कंटक; काटे नसलेला. २. (ल.) संकट, विरोध नसलेला; शत्रू नसलेला. [सं.]

अकातणे

अक्रि.

१. अधाशीपणा करणे. २. आक्रोश करणे : ‘अशी अकातल्यासारखी काहून करतं?’ – माणूस ७४. [सं. आक्रांत]

अकादमी

स्त्री.

१. साहित्य, कला, शास्त्र यांचे संगोपन, संशोधन व संवर्धन यासाठी स्थापन केलेली संस्था. २. एखाद्या विशिष्ट कलेचे वा व्यवसायाचे शिक्षण देणारी, त्यासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देणारी संस्था. उदा. सैनिकी अकादमी. [इं. अॅकॅडमी]

अकामी

वि.

निरुपयोगी; निकामी; व्यर्थ.

अकाम्य

वि.

फलाची अपेक्षा न करता, निष्काम बुद्धीने केलेले; कामनारहित; निरपेक्ष; निर्हेतुक; निर्लोभी. [सं.]

अकार

पु.

‘अ’ हा स्वर. [सं.]

अकारण

वि.

१. निमित्तावाचून; विनाकारण; व्यर्थ; उगीचच. २. गरज नसताना; उपायोग नसताना; काही फायदा नसताना; निरुपयोगी; मिथ्या. ३. स्वयंसिद्ध (र्इश्वर) : ‘म्हणवुनि मज एकेविण । हे त्रयीधर्म अकारण ॥’ – ज्ञा. ९·३३४. [सं.]

अकारण बंधु, अकारण बंधू

पु.

निरपेक्ष सहायक; निमित्त नसताना होणारा मित्र : ‘सरकारचे अकारण बंधूही त्याजविरुद्ध आहेत.’ –लोटिकेले २·२·२७५.