शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकारणिक

वि.

१. निरुपयोगी; निष्फळ. २. ज्याची गरज नाही असे; ज्यातून काही निष्पन्न होऊ शकत नाही असे. [सं.]

अकारणी

पहा : अकारणिक

अकारादी वर्ण

अकारापासून सुरू होणारी वर्णमाला; ‘अ’ पासून आरंभ होणारी मूळाक्षरे. [सं.]

अकारान्त

वि.

अ ज्याच्या शेवटी आहे असे. [सं.]

अकारीब

पु.

१. नातलग; जवळचे लोक; अंतेवासी. २. माहीतगार; जाणते : ‘तुम्ही सर्व त्या प्रांतीचे अकारीब. जावे न जावे.’ – मइसा १·२८१. [अर.]

अकार्पण्य

न.

१. कृपणतेचा अभाव; समृद्धी. २. उदारपणा; सढळपणा. [सं.]

अकार्बनी

वि.

(रसा.) रसायनशास्त्राची एक शाखा; ज्याच्या मूलद्रव्यातील सूत्रामध्ये कार्बन–कर्ब–नाही अशी वस्तू. उदा. प्राणी किंवा वनस्पती ज्या पदार्थांचे बनलेले असतात त्यापेक्षा वेगळ्या पदार्थांचे बनलेले किंवा असलेले; अनैसर्गिक प्रक्रियेपासून बनलेले.

अकार्य

न.

अयोग्य कृत्य; गुन्हा; पाप; अपराध; दोष.

अकार्य

वि.

करण्याची गरज नाही असे; अयोग्य; जे करू नये असे. [सं.]

अकार्यक्षम

वि.

एखादे काम करण्याची कुवत नसलेला.

अकाल

पु.

शीख धर्मीयांचा र्इश्वर. १. अयोग्य वेळ; भलतीच वेळ. २. दुष्काळ; दुर्भिक्ष; बेमोसमी घडलेली, झालेली गोष्ट. [सं.]

अकालज

वि.

अवेळी जन्मलेला; भलत्याच किंवा अशुभ वेळी उत्पन्न झालेला किंवा जन्मलेला. [सं.]

अकालजन्म

पु.

अवेळी जन्म. [सं.]

अकालपक्व

वि.

(वन.)१. लवकर फुले व फळे धरलेला; आगस; आगसलेला; हळवा; हळा. २. (ल.) वागणे बोलणे यात अवेळी प्रौढपणा आलेला; अकाली वयस्क झालेला. [सं.]

अकालपक्वता

स्त्री.

१. अवेळी आलेले पिकलेपण (फूल व फळ). २. अवेळी आलेला प्रौढपणा; लहान वयात आलेली समजूत. [सं.]

अकालप्रसव

पु.

दिवस पूर्ण भरण्यापूर्वी झालेला जन्म. [सं.]

अकालप्रसूत

वि.

दिवस पूर्ण भरण्यापूर्वी प्रसूत झालेली (स्त्री). [सं.]

अकालप्रौढ

वि.

(समाज.) लहान वयातच प्रौढाप्रमाणे वागणारा; अधिक समजूतदार. [सं.]

अकालमृत्यु, अकालमृत्यू

पु.

वय झाले नसताना आलेले मरण; अवेळी मरण; लहानपणी, तरुणपणी आलेले मरण. [सं.]

अकालवचन

न.

वेळप्रसंगाला धरून नसलेले, असमयोचित बोलणे. [सं.]