शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकालवृष्टि, अकालवृष्टी

स्त्री.

बेमोसमी पाऊस, अवेळी पडलेला पाऊस. [सं.]

अकालिक

वि.

अवेळी; फार आधी; लवकर; योग्य वेळेपूर्वी; भलत्याच वेळी; अयोग्य वेळी केलेले, घडलेले. [सं.]

अकालिका

पु.

तांबडसर रंगीबेरंगी पानांचे शोभेचे एक झाड. [इं.]

अकाली

पु.

१. शीख धर्मातील एक पंथ. २. या पंथाचा अनुयायी.

अकालीन

वि.

अवेळचा; अप्रासंगिक; अयोग्य वेळी आणलेला, केलेला; भलत्याच वेळचा. [सं.]

अकालोत्पन्न

अकाली उत्पन्न झालेला. पहा : अकालज

अकाल्पनिक

वि.

वास्तविक; बनावट नसलेला; मुळास धरून; कल्पनेत नसलेला; कल्पनेतून न काढलेला; सत्य; खरा; अकृत्रिम. [सं.]

अकाळ

पु.

(ल.)अयोग्य वेळ; अवेळ; अकाल; दुष्काळ : ‘जैसें कां अभ्रपटल । अकाळीचें ॥’ – ज्ञा. ३·१४१. [सं.]

अकाळणी

पहा : अकाळवणी : ‘चोच व्यथेची टिपते दाणा, अकाळणीच्या मृद्गंधाचा’ – पुथें ८३.

अकाळवणी

पहा : अकळवणी

अकाळविजू

स्त्री.

अवेळी चमकणारी वीज : ‘जो अरिराय अकाळ – विजू’ – रुस्व २४८. [सं. अकालविद्युत्]

अकाळवेळ

स्त्री.

कोणतीही वेळ; अनिश्चित वेळ : ‘बेबंद धाडी येत अकाळवेळी’ – एहम १. [सं. अकालवेला]

अकाळ्या

वि.

अवेळी पडलेला (पाऊस); पावसाळा नसताना पडलेला; अप्रासंगिक.

अकांचन

वि.

निर्धन; द्रव्य नसलेला; द्रव्यहीन; कंगाल. [सं.]

अकांचित

क्रिवि.

अवचित; अचानक; एकाएकी : ‘अकांचित कानात बसलेला विमानाचा आवाज सुरू झाला’ – ऊन ३७.

अकांड, अकांडी

वि.

अकाली; अनपेक्षित : ‘अकांड प्रलयीं रक्षणकारी ।’ – सप्र ६·२१. [सं.]

अकांडतांडव

न.

१. प्रमाणाबाहेर राग आल्यामुळे केलेला आरडाओरडा; मोठमोठ्याने बोलणे; हातपाय आपटणे. २. जाणूनबुजून रागाचे नाटक करणे; आरडाओरडा करणे. [सं.]

अकांडा

पु.

आकांडा; वाडग्यात जाण्यासाठी वाटेत लावलेल्या दुबेळक्यावरील आडवे लाकूड : ‘फाटकाला लावलेल्या अकांड्यावरून चपळ उडी घेऊन...’ – शेलूक १२९.

अकांडी

पहा : अकांड

अकांतणे

क्रि.

आक्रोश करणे.