शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकांत लोकांत

पु.

१. लोकांसमोर गळे काढून रडणे; सर्वांसमोर आक्रोश मांडणे. २. घाबरणे. (गो.)

अकि

स्त्री.

सडीक तांदूळ. [का. अक्की]

अकिलाट प्रवृत्ती

स्त्री.

(आयु.) जखमेतील रक्त न गोठणेमुळे व रक्ताचा अखंड प्रवाह चालू राहण्यामुळे होणारा विकार.

अकिंचन

वि.

ज्याच्याजवळ काहीही नाही असा; अतिशय गरीब; कंगाल. [सं.]

अकिंचित

वि.

क्षुल्लक; क्षुद्र; निरुपयोगी; बेकाम; प्रभाव, महत्त्व किंवा उपयोग नसलेली (व्यक्ती किंवा वस्तू). [सं.]

अकिंचितज्ञान

न.

अगदी थोडे ज्ञान. [सं.]

अकीक

पु.

१. तांबूस, कठीण असे एक प्रकारचे रत्न; अगेट (गोमेद) आणि सिलिका (गार) यांनी बनलेले रत्न. २. सिलिकाचे गूढस्फटिकी किंवा अर्धस्फटिकी खनिज. [अर.]

अकीद, अकीदत

पु. स्त्री.

निष्ठा; दृढविश्वास.

अकीन

पु.

१. दृढविश्वास; खात्री; सत्य. २. सत्याचा वाली. [अर. यकीन]

अकीर्तनीय

वि.

स्तुती करण्यास अपात्र; प्रशंसापर उल्लेख करण्याजोगा नसलेला. [सं.]

अकीर्ति, अकीर्ती

स्त्री.

दुष्कीर्ती; बदनामी; दुर्लौकिक; कुप्रसिद्धी; नाचक्की. [सं.]

अकीर्तिकर

बदनामी करणारे; दुर्लौकिक पसरवणारे. [सं.]

अकीलदाना

वि.

सुज्ञ; प्रज्ञावन्त : ‘दराज काय लिहिणे आभोहिबापन्हा – अकीलदाना आहेत.’ – शिचसाखं ५. [अर.]

अकुटेदुकुटे

मुलांचा ठिकरीचा खेळ.

अकुतोभय

वि.

१. ज्याला कशाचीही भीती नाही असा; ज्याला कुठूनही भय नाही असा; निर्भय; धीट; संकटे सहन करण्यास समर्थ; बेडर; निर्धास्त : ‘हा संपूर्ण प्रबंध म्हणजे.... अकुतोभय अधिकारी पुरुषाचे बोल वाटतात.’ – आज्ञा उपोद् ३९·२. सुरक्षित; पक्की; मजबूत (इमारतीसंबंधी). [सं.]

अकुल

पु.

शंकराचे एक नाव : ‘हा योगू शास्त्रार्थ बोलिला । विशद केला अकुलागर्मी ।’ – एभा १४·४६०.

अकुल

वि.

हीन कुल. [सं.]

अकुलज

वि.

हलक्या, हीन कुळात जन्मलेला; क्षुद्र; नीच. [सं.]

अकुलीन

आचारहीन; चारित्र्य नसलेला.

अकुशल

वि.

१. एखाद्या कामाचे कसब न शिकलेला; बिनकसबी; अनिष्णात; केवळ अंगमेहनतीचे काम करणारा (कामगार). २. अशुभ; दुःखकारक. [सं.]