शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकुहरी (भूशा.)

वि.

१. घट्ट बांधलेला; सुसंबद्ध; घट्ट. २. छिद्रे नसलेला; एकसंध. [सं.]

अकुळी

वि.

ज्याचे कूळ कुणालाही माहीत नाही असा; कुलरहित : ‘एक म्हणती नंदाचा । एक म्हणती वसुदेवाचा । ठाव नाही बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ॥’ – एरुस्व २·३. [सं. अकुल]

अकुंठ, अकुंठित

वि.

अडथळा न येता चालू असलेले; अखंड; अप्रतिहत; अबाधित; अप्रतिबद्ध; अरुद्ध. (वाचा, गती इ.) : ‘रोटीबेटीच्या अकुंठित व्यवहाराचे.’ – केतका ७८. [सं.]

अकुंठित

वि.

(वन.) अंकुर किंवा फुलोरा यांच्या प्रमुख अक्षाची न थांबता चालू राहणारी (वाढ). [सं.]

अकूट

न.

विष न पाजलेले (शस्त्र.). [सं.]

अकूपार

पु.

१. समुद्र. २. खडक. ३. कासव. ४. सूर्य. [सं.]

अकूर

पु.

घोड्याचा एक रोग : ‘घोड्याने उडी मारली असता बरगडी मोडते तो.’ – अश्वप ३०१. [सं.]

अकृत

वि.

न केलेले; न संपविलेले.

अकृत

न.

वार्इट कृत्य; पातक. [सं.]

अकृतकाल

वि.

बिनमुदतीचे (कर्ज, व्याज इ.); कालमर्यादा नसलेले.

अकृताकृत

पहा : अक्रीत

अकृताभ्यागम

पु.

(तत्त्व.) स्वतः न केलेल्या कर्माचे फळ एखाद्याला मिळणे. [सं.]

अकृताश्रम

वि.

आश्रमातीत; वर्णाश्रम धर्मापलीकडे गेलेला : ‘आत्माभ्यासी परिश्रम । करूनि निरखिले कर्माकर्म । यालागीं ते अकृताश्रम । निज निभ्रय स्वयें जाहले ॥’ –एभा २·१६६. [सं.]

अकृति, अकृती

स्त्री.

(विधी) कायद्याप्रमाणे करायला हवी अशी गोष्ट न करणे; न केलेली कृती. [सं.]

अकृत्य

न.

निषिद्ध कर्म; गैरकृत्य; वार्इट काम; पाप. [सं.]

अकृत्रिम

वि.

१. नैसर्गिक; स्वाभाविक; सहज; स्वयंभू; अनिर्मित; मनुष्याने न केलेला. २. वास्तविक; खरे; वस्तुस्थितीस धरून. ३. अस्सल; बनावट नसलेला. ४. स्वयंभू. ५. निष्कपटी; प्रामाणिक; मोकळ्या मनाचा.

अकृष्य

वि.

उखर; कसण्यास योग्य नसलेली; बरड (जमीन).

अक्लृप्त

वि.

ज्याबद्दल पूर्वी काही योजना केली नाही असा; विचार न केलेला; न शोधलेला. [सं.]

अकेवलत्व

(तत्त्व.) बहुविधत्व; अनेकविधत्व; विविधत्व.

अकोचणे

अक्रि.

संकोचणे; आकाराने लहान होणे; अंग लपविणे : ‘मूळ तो लपाला अकोचुनि ।’ – दावि ३·२८. [सं.आ+कुच]