शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकडणे

अक्रि.

१. ऐट करणे; डौल मिरवणे; नखरा करणे. २. पहा : आखडणे : ‘दररोज सकाळी अकडणाच्या कमरेला …’ -शिळान १२७.

अकडबाज

वि.

ऐटबाज; गर्विष्ठ.

अकडंतिकडं

न.

१. वायफळ बडबड. २. टाळाटाळ; चुकवाचुकवी.

अकडंतिकडं

क्रिवि.

विसंगतपणे; विचूकपणे (वागणे, बोलणे इ.).

अकडाई

स्त्री.

ऐट करण्याची सवय; नखरेलपणा.

अकढा

वि.

१. पूर्णपणे न कढलेला किंवा कढविलेला (पदार्थ). २. वितळेपर्यंत न तापवलेला (धातू).

अकण

वि.

१. कणी नसलेला स्वच्छ (तांदूळ). २. दाणे नसलेले (कणीस). ३. खायला एक कणही नाही असा; दरिद्री. [सं.]

अकणनिकण

न.

एकदा मळून धान्य काढलेली कणसे पुन्हा मळून त्यातून निघालेले धान्य : ‘अकणनिकण कालवून धान्य त्याच्या माथीं मारावयाचे’ – गांगा १२३.

अकथ्या

पु.

कथापुराण न सांगणारा माणूस; पोथी न वाचणारा माणूस : ‘अजन्म्यासि कैंचि जाति । अक्रिया कासया ज्योति । निर्मळासि कशाने धूति । अकथ्या न पोथी कथनाची ।’ – सिसं १३·१२६.

अकद

वि.

स्थूल; लठ्ठ; बेडौल. [अर.]

अकदस

वि.

अत्यंत पवित्र; पुण्यवान; पुण्यशील. [अर.]

अकनिष्ठ

पु.

१. गौतमबुद्धाचे एक नाव. २. बौद्धदेवतांचा एक वर्ग. [सं.]

अकपट

वि.

१. ज्याच्या मनात कपट नाही असा. २. ज्यात लबाडी, खोटेपणा नाही असा (माल, वागणूक, व्यवहार इ.). न. मोकळेपणा; निर्व्याजता; शुद्धभाव. [सं.]

अकब

क्रिवि,

मागून; नंतर.[फा.]

अकबर

वि.

सर्वांत श्रेष्ठ; थोर; मोठा. [अर.]

अकबरनवीस

पु.

पहा : अख्बारनवीस : ‘त्याने लागलीच अकबरनविसास बोलावूनआणून त्यास ते काय आहे ते वाचण्यास सांगितले.’ – वज्रा १९१.

अकबरनीस

पु.

पहा : अख्बारनवीस : ‘त्याने लागलीच अकबरनविसास बोलावूनआणून त्यास ते काय आहे ते वाचण्यास सांगितले.’ – वज्रा १९१.

अकबरशाही

वि.

१. अकबरबादशहाने चालू केलेले (रुपया, मोहोर वगैरे चलनी नाणे). २. अकबर बादशहाने रूढ, प्रचलित केलेला इ. ३. अकबर बादशहासंबंधीचा.

अकबरी

स्त्री.

१. अकबराने चालू केलेली मोहोर.२. अकबराशी संबंधित (अकबराने चालू केलेले) कायदे, नाणी वागण्याच्या पद्धती वगैरे. ३. तांदळाच्या पिठाचा केलेला एक पदार्थ.

अकबरी मोहर

स्त्री.

१. अकबराने सुरू केलेले पंधरा रुपये किंमतीचे सोन्याचे नाणे. २. या नाण्यांची केलेली माळ. ३. (ल.) इभ्रतदार (व्यापारी).